आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी बीसीसीआयने जोरदार तयारी सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआय आणि आयपीएल फ्रेंचायझींचे मालक यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली.
त्यापैकी एक महत्वाचा विषय म्हणजे खेळाडूंना रिटेन करण्याचा नियम. आयपीएल २०२५ स्पर्धेसाठीचा लिलाव या वर्षाच्या शेवटी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान रिटेन खेळाडूंच्या नियमासह आणखी २ नियमांमध्ये बदल होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.
आयपीएलमध्ये २ बाऊन्सर्सचा नियम लागू करण्यात आला होता. मात्र हा नियम कायम ठेवला जाणार की नाही, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. आयपीएलमध्ये हा नियम लागू करण्यापूर्वी, हा नियम देशांतर्गत क्रिकेटमध्ये लागू करण्यात आला होता.
आयसीसीच्या नियमानुसार गोलंदाजांना एका षटकात केवळ १ बाऊन्सर टाकण्याची अनुमती दिली जाते. मात्र आयपीएलमध्ये याऊलट, म्हणजेच गोलंदाजाला एका षटकात २ बाऊन्सर टाकण्याची अनुमती दिली जाते. त्यामुळे हा नियम आयसीसीच्या नियमांच्या विरुद्ध आहे. मात्र यावेळी हा नियम आयपीएलमध्ये लागू करण्यात येईल की नाही, हे सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या आयोजनानंतर कळेल. या स्पर्धेला नोव्हेंबरमध्ये सुरुवात होणार आहे.
इम्पॅक्ट प्लेअर नियम सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात आहे. अनेकांनी या नव्या नियमाचं समर्थन केलं होतं. तर काही दिग्गज खेळाडूंनी या नव्या नियमाचा विरोध केला होता. दरम्यान भारताचा माजी गोलंदाज जहीर खानने या नियमाला समर्थन केल्याचे पाहायला मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईकर जहीर खानने लखनऊ सुपर जायंट्स संघात मेंटॉर म्हणून एन्ट्री केली आहे. यावेळी तो बोलताना तो म्हणाला की, ' इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमावरुन अनेक चर्चा झाल्या. मात्र मी ऑन रेकॉर्ड सांगतोय, मी या नियमाला समर्थन करतोय.'
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.