गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून आयपीएलमधील लखनऊ सुपर जायंट्स संघाचा नवा मेंटॉर कोण असेल याबाबत कमालीची उत्सुकता होती. पण आता ही उत्सुकताही संपली आहे. कारण भारताचा माजी गोलंदाज झहीर खान हा लखनऊ संघाचा मेंटॉर असेल.
आयपीएल २०२५ साठी मेगा लिलाव होणार आहे. त्यामुळे खेळाडूंच्या रिटेंशनशी संबंधित नियमांमुळं अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तर दुसरीकडे आयपीएल २०२५ साठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. लखनऊ संघानं मेंटॉर म्हणून झहीर खानची नेमणूक केली आहे.
२०२३ पर्यंत लखनऊचा मेंटॉर गौतम गंभीर होता. मात्र, गेल्या मोसमात लखनऊची साथ सोडून कोलकाता नाइट रायडर्ससोबत गेला. गंभीरनंतर LSG ला कुणीही मेंटॉर नव्हता. आता दीड वर्षानंतर संघाला मेंटॉर मिळाला आहे.
झहीर खान टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा डायरेक्टर ऑफ क्रिकेट म्हणूनही जबाबदारी निभावली आहे. ४५ वर्षीय झहीरने एकूण १०० आयपीएल सामने खेळले आहेत. त्यात १०२ विकेट घेतल्या आहेत.
भारतीय संघाच्या सर्वात यशस्वी गोलंदाजांमध्ये झहीरचं नाव घेतलं जातं. २००० ते २०१४ पर्यंत त्यानं भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. २०११ वनडे वर्ल्डकप चॅम्पियन संघात तो होता आणि त्या यशामध्ये झहीरचा वाटा मोठा होता.
भारताकडून झहीर खान यानं ९२ कसोटी, २०० वनडे आंतरराष्ट्रीय, १७ टी २० सामने खेळले आहेत. कसोटीत त्यानं ३११ विकेट्स, वनडेमध्ये २८२ विकेट, तर टी २० सामन्यांत १७ विकेट्स घेतल्या आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.