narendra modi  twitter
Sports

Team India Victory Celebration: बीसीसीआयकडून नरेंद्र मोदींना 'नमो 1' चॅम्पियन जर्सी गिफ्ट! पाहा PHOTO

BCCI Gift To Narendra Modi: बीसीसीआयने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताची जर्सी गिफ्ट म्हणून दिली आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघाने तब्बल १७ वर्षांनंतर आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकला आहे. २९ जून रोजी वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू गुरुवारी मायदेशात दाखल झाले आहेत. मायदेशात आल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू दिल्लीतील ICT Maurya हॉटेलमध्ये गेले. काही काळ विश्रांती केल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी रवाना झाले. दरम्यान बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना जर्सी गिफ्ट केली आहे.

नरेंद्र मोदींनी भारतीय संघातील खेळाडूंची भेट घेतल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान पंतप्रधानांच्या निवासस्थानी भेट घेऊन रॉजर बिन्नी आणि जय शहा यांनी नरेंद्र मोदी यांना 'नमो १' चॅम्पियन नावाची जर्सी गिफ्ट केली आहे. हे जर्सी गिफ्ट केल्याचे फोटो बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. ज्यावर त्यांनी कॅप्शन म्हणून'विजयी भारतीय क्रिकेट संघाने आज त्यांच्या आगमनानंतर भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांची त्यांच्या अधिकृत निवासस्थानी भेट घेतली.साहेब, आपल्या प्रेरणादायी शब्दांसाठी आणि आपण दिलेल्या अमूल्य समर्थनासाठी आम्ही आपले मनःपूर्वक आभार मानतो.' असं लिहिण्यात आलं आहे.

एअर इंडियाचं विमान, २९ जुलैला बारबाडोसहून दिल्लीला येण्यासाठी निघालं. त्यानंतर ३० जुलैला सकाळी ६ वाजता हे विमान दिल्लीत लँड झालं. दिल्लीतील क्रिकेट फॅन्स मध्यरात्रीपासूनच दिल्ली विमानतळाबाहेर खेळाडूंच्या प्रतीक्षेत उभे होते. खेळाडू ६ वाजता दिल्लीला पोहोचले. त्यानंतर खेळाडूंनी विमानतळावरच जल्लोष केला. इथून हे खेळाडू ICT Maurya हॉटेलला जाण्यासाठी रवाना झाले. त्यानंतर १० वाजता खेळाडू नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जायला निघाले.

एकनाथ शिंदे घेणार भेट

वर्ल्डकपविजेत्या भारतीय संघाचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडूनही सन्मान केला जाणार आहे. ४ जुलै रोजी नरेंद्र मोदींनी खेळाडूंची भेट घेतली. त्यानंतर ५ जुलै रोजी एकनाथ शिंदे यांनी रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादव या ४ खेळाडूंना विधानसभेत भेटण्यासाटी बोलावलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: ठाणे स्टेशन स्थानकात रेल्वे प्रवाशांची तुफान गर्दी

Crime : बायकोचं अनैतिक संबंध असल्याचा संशय, नवऱ्याने जावयाच्या मुलाचा प्रायव्हेट पार्टच कापला

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचा ‘Thama’मधील ग्लॅमरस लूक पाहून चाहते थक्क; पोस्टर प्रदर्शित

ठाण्यात पावसाचा धुमाकूळ, शाळा सोडल्या; विद्यार्थ्यांना बोटीतून नेलं, पाहा VIDEO

Aadesh Bandekar Son: आदेश बांदेकरांचा लेक लवकरच अडकणार विवाह बंधानात; 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत थाटणार संसार

SCROLL FOR NEXT