jay shah  saam tv
Sports

Asia Cup 2023: आशिया चषक स्पर्धेतून अब्जावधी कमावणारी BCCI स्वतः कडे एक रुपयाही ठेवत नाही; पैसा जातो तरी कुठे?

Asia Cup Earning: आशिया चषक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान आणि श्रीलंकेत केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

Ankush Dhavre

Aakash Chopra: आशिया चषक २०२३ स्पर्धेचा वाद अखेर मिटला आहे. ही स्पर्धा कुठे पार पडणार, यावरून बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात चर्चा सुरु होत्या. अखेर हा वाद मिटला असून, आशिया चषक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान आणि श्रीलंकेत केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

स्पर्धेतील ४ सामने पाकिस्तानात तर उर्वरित ९ सामने श्रीलंकेत होणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनातून बोर्ड कोट्यवधी रुपये कमवतात. मात्र बीसीसीआय एक रुपया देखील स्वतः कडे ठेवत नाही. याबाबत माजी भारतीय क्रिकेटपटूने मोठा खुलासा केला आहे.

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की. 'अखेर आशिया चषक स्पर्धेचा वाद आता मिटला आहे. मला एक गोष्ट सांगावीशी वाटतेय. आशिया चषक स्पर्धेत ब्रॉडकास्टिंगद्वारे कोट्यवधींची कमाई केली जाते. आतापर्यंत बीसीसीआयने यातला एक रुपया देखील घेतला नाहीये.' (Latest sports updates)

तसेच आकाश चोप्रा पुढे म्हणाला की, 'जेव्हा बीसीसीआयच्या वाटेला काही येतं, ते देखील बीसीसीआय एसीसीच्या (एशियन क्रिकेट काउंसिल) स्वाधीन करते. याच रकमेचा वापर चांगल्या कामासाठी केला जातो. जे देश क्रिकेटमध्ये पुढे जाऊ पाहताय त्याच देशांवर ही रक्कम खर्च केली जाते. बीसीसीआयला पैशांची गरज नाही. त्यांच्याकडे भरपूर पैसे आहे. मात्र श्रीलंका, पाकिस्तान किंवा इतर देश असं काही करत नाही. ते ही रक्कम स्वतःच ठेवतात.'

बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डपैकी एक आहे. गेल्या काही वर्षात बीसीसीआयने क्रिकेटचा स्टार उंचावला आहे. एका वृत्तानुसार बीसीसीआयची एकूण कमाई ही २ बिलियन डॉलर्स इतकी आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम १६ हजार कोटी रुपये इतकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्ही शांत आहोत, याचा गैरसमज आम्ही #@$ डू नाही - राज ठाकरे

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT