Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रात घराच्या प्रत्येक वस्तूला आणि तिच्या दिशेला विशेष महत्व आहे.
वास्तुशास्त्रानुसार, घरात घड्याळ योग्य दिशेला लावणे महत्वाचे आहे. वास्तुशास्त्रानुसार, घड्याळाची योग्य दिशा सकारात्मक ऊर्जा, घरातील सदस्यावर परिणाम करते.
उत्तर दिशा ही कुबेराची आणि समृद्धीची दिशा मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार या दिशेला घड्याळ लावल्याने घरात धनाचा ओघ वाढतो आणि करिअरमध्ये नवीन संधी मिळतात.
ईशान्य दिशा ही देवाचे स्थान मानली जाते. या दिशेला घड्याळ लावल्याने घरातील मानसिक तणाव दूर होतो आणि कुटुंबात शांतता व सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.
पूर्व दिशा ही सूर्यदेवाची आणि प्रगतीची दिशा मानली जाते. जर उत्तर किंवा ईशान्येकडे जागा नसेल तर पूर्व भिंतीवर घड्याळ लावावे. यामुळे घरातील सदस्यांचे आयुष्य समृद्ध होते आणि प्रतिष्ठा वाढते.
दक्षिण दिशेला घड्याळ कधीही लावू नये.
दाराच्या चौकटीच्या अगदी वर घड्याळ लावणे टाळावे.
घरात बंद पडलेले, काच फुटलेले किंवा धूळ साचलेले घड्याळ कधीही ठेवू नका.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.