Chetan Sharma Sting Operation Team India Saam TV
Sports

Sport News : टीम इंडियाचे खेळाडू इंजेक्शन घेऊन खेळतात? स्टिंग ऑपरेशनमधून खळबळजनक खुलासा

बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत.

Satish Daud

Chetan Sharma Sting Operation Team India : गेल्या काही वर्षांपासून टीम इंडियाने क्रिडा विश्वात आपला चांगलाच दरारा निर्माण केला आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये टीम इंडिया आघाडीवर आहे. एकीकडे टीम इंडियाचे खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत असताना, दुसरीकडे बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. (Latest Marathi News)

भारतीय संघाचे (Team India) खेळाडू हे नेहमी फिट राहण्यासाठी खास इंजेक्शन घेत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. भारताचे कोणते खेळाडू फिटनेस वाढवण्यासाठी इंजेक्शन घेतात, हेदेखील चेतन शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या दाव्याने क्रिडा विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले चेतन शर्मा?

भारतीय संघ डोपिंगच्या (उत्साहवर्धक इंजेक्शन) विळख्यात अडकल्याचं चेतन शर्मा यांनी सांगितलं. टीम इंडियातील अनेक खेळाडू स्वत:ला फीट ठेवण्यासाठी इंजेक्शन घेतात. ही बाब बीसीसीआयला माहीत असूनही क्रिकेट बोर्डाकडून याकडे कानाडोळा केला जातो, असा धक्कादायक खुलासा चेतन शर्मा यांनी केला आहे.  (Latest Sports Update)

भारतीय संघात खेळण्याच्या लालसेपोटी हे खेळाडू अनफिट असूनही फिटनेस चाचणीपूर्वी अशी इंजेक्शन्स घेतात, ज्यामुळे त्यांची शारीरिक क्षमता वाढते आणि डोपिंग चाचणीही त्यांना पकडत नाही. या विशेष प्रकारच्या इंजेक्शनच्या आधारे ते ही फिटनेस चाचणी उत्तीर्ण होतात, असंही ते म्हणाले. ‘झी न्यूझ’ने छुप्या कॅमेऱ्याच्या मदतीने चेतन शर्मा यांचं हे स्टिंग ऑपरेशन केलं आहे.

दरम्यान, चेतन शर्मा यांनी केलेले खळबळजनक खुलासे हे भारतीय क्रिकेटसाठी ही गंभीर बाब आहे. पण या सर्व प्रकणात आता बीसीसीआय नेमकं पुढे काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. कारण बीसीसीआय आता या खेळाडूंविरोधात कडक पाऊल उचलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT