Shreyas Iyer latest News saam tv
Sports

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shreyas Iyer latest News : भारताचा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर याला आशिया कप २०२५ साठी भारतीय संघात संधी न दिल्यानं चाहत्यांनी निवड समितीसह कोचवरही टीका केली होती. आता बीसीसीआयनं अय्यरला थेट कर्णधार केले आहे.

Nandkumar Joshi

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये दमदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडिया 'चॅम्पियन' ठरली होती, त्याच श्रेयस अय्यरला आशिया कप २०२५ मध्ये स्थान दिलं नाही. त्यामुळं क्रिकेट विश्वात टीकेचं मोठं वादळ उठलं. पण आता बीसीसीआयच्या निवड समितीच्या एका निर्णयानं हे वादळ आता शमेल, अशी चिन्हे आहेत. कारण ज्याच्यामुळं वादळ उठलं होतं, त्या श्रेयस अय्यरकडं मोठी जबाबदारी दिली आहे. अजित आगरकरच्या नेतृत्वातील निवड समितीने ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी भारत अ संघाची घोषणा केली आहे. आशिया कपमध्ये संधी न दिलेल्या श्रेयस अय्यरकडे संघाचं कर्णधारपद दिलं आहे.

भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ या दोन संघांत चार दिवसीय सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यासाठी ऑस्ट्रेलियाचा अ संघ भारत दौऱ्यावर येत आहे. हे दोन्ही सामने लखनऊमध्ये खेळवण्यात येणार आहेत. पहिला सामना १६ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. तर दुसरा सामना २३ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर दरम्यान होणार आहे.

या मालिकेनंतर वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. त्यासाठी अद्याप संघाची घोषणा झाली नाही. हे तीन सामने ३० सप्टेंबर, ३ ऑक्टोबर आणि ५ ऑक्टोबरला होणार आहेत.

अय्यर वनडे संघाचा कर्णधार होणार?

अय्यरला यूएईमध्ये होणाऱ्या आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलं नाही. यावरून निवड समिती, हेड कोच गौतम गंभीर यांच्यावरही टीका झाली. त्याचवेळी अय्यरला मोठी जबाबदारी देण्याच्या विचारात बीसीसीआय असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये येऊन धडकले. अय्यरला वनडे संघाचा पुढचा कर्णधार म्हणून बघितले जात असल्याचेही त्यात म्हटले जात होते. भारत अ संघाचं कर्णधारपद देणे हे त्याच दिशेने उचललेले पाऊल असल्याचे मानले जात आहे.

ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी भारत अ संघाची घोषणा झाली आहे. विकेटकीपर ध्रुव जुरेल याला संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर उपकर्णधारपदाची जबाबदारीही दिली आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या एन जगदीशनलाही स्थान देण्यात आलं आहे. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघात घेतलेल्या नितीश कुमार रेड्डी आणि प्रसिद्ध कृष्णा यांनाही या संघात स्थान देण्यात आलं आहे.

केएल राहुल-सिराजही यांनाही संधी

भारतीय संघाचे वरिष्ठ खेळाडू केएल राहुल आणि इंग्लंड दौऱ्यात अखेरच्या सामन्यात भारताच्या विजयाचा शिल्पकार मोहम्मद सिराज यालाही भारत अ संघात खेळण्याची संधी मिळणार आहे. हे दोघेही सुरुवातीच्या दोन सामन्यांत खेळणार नाहीत. दुसऱ्या सामन्यात ते खेळणार आहेत.

भारत अ संघ पुढीलप्रमाणे

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, एन जगदीशन, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, देवदत्त पडिक्कल, हर्ष दुबे, आयुष बदोनी, नितीश कुमार रेड्डी, तनुष कोटियान, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, मानव सुथार, यश ठाकूर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मावळात दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित

Mumbai Metro 11: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! वडाळ्यावरुन थेट गेट वे ऑफ इंडियाला जा, नव्या मेट्रो मार्गाला मंजुरी

Bollywood Controversy: इंडस्ट्री माफियांचा खरा चेहरा केला उघड; अभिनेत्रीने प्रसिद्ध दिग्दर्शकासोबतची कॉल रेकॉर्डींग केली लीक

Buldhana : शालेय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! पोषण आहार रद्दी पेपरवर वाटला, प्रशासन तरीही गप्प?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! ७.५ लाख महिलांचे अर्ज बाद; कारण काय? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT