
महिला क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेची तिकीट विक्री सुरू
किमान तिकीटाची किंमत फक्त १०० रुपये
भारत आणि श्रीलंकेत वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन
महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ स्पर्धेची उत्सुकता ताणली गेली आहे. भारत आणि श्रीलंका या दोन शेजारी देशांमध्ये ही स्पर्धा होत आहे. भारतात हे सामने कुठे - कुठे होणार आहेत, त्याबाबतही प्रेक्षकांमध्ये कमालीचं कुतूहल आहे. त्यात भर म्हणून या स्पर्धेच्या तिकीटांची विक्री ४ सप्टेंबरपासून सुरू झाली असून, किमान तिकीट फक्त १०० रुपयांना विकला जाणार आहे.
महिला क्रिकेट वर्ल्डकप आयसीसीची सर्वात स्वस्त वैश्विक स्पर्धा ठरली आहे. कारण, वर्ल्डकपच्या सामन्याचे तिकीट विक्री दर किमान १०० रुपयांपासून सुरू होत आहे. आयसीसीच्या अनेक स्पर्धा होतात. महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटांत या स्पर्धा भरवल्या जातात. पण इतके कमी तिकीट दर अद्याप कोणत्याच सामन्यांसाठी नव्हते.
४ सप्टेंबरपासून प्री-सेल ४ दिवसांसाठी सुरू असेल. २०२२ मध्ये आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धा झाली होती. ती न्यूझीलंडकडं यजमानपद होतं. मागील स्पर्धेत लहान मुलांचंही तिकीट जवळपास साडेतीनशे रुपये होते. तर प्रौढांसाठी साडेआठशे रुपयांच्या आसपास होते.
महिला क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद यंदा भारत आणि श्रीलंका या दोन देशांकडून भूषणवण्यात येत आहे. ३० सप्टेंबरला गुवाहाटीमध्ये या स्पर्धेच्या उद्घाटनाचा सामना होईल. त्याच्या चार आठवड्यांआधीच आयसीसीने तिकीटांची विक्री सुरू केली आहे.
महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये आठ संघ सहभागी आहेत. भारत, श्रीलंका, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बांगलादेश, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. सर्व संघ राउंड रोबिन फॉरमॅटमध्ये सामने खेळतील. प्रत्येक संघाला उर्वरित सात संघांसोबत प्रत्येकी एक सामना खेळावा लागणार आहे. पॉइंट्स टेबलमधील अव्वल चार संघ सेमिफायनलमध्ये भिडणार आहेत. त्यानंतर थेट फायनलचा सामना होणार आहे. २ नोव्हेंबरला फायनलचा सामना होणार आहे.
पाकिस्तानचा संघ सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे. जर पाकिस्तानचा संघ फायनलमध्ये पोहोचला तर, तो सामनाही श्रीलंकेत होईल. पाकिस्तानचा संघ बाहेर झाला तर, फायनल भारतात खेळवण्यात येईल. तत्पूर्वी आयसीसीने महिला क्रिकेट वर्ल्डकपसाठी रेकॉर्ड प्राइस मनी जाहीर केली. या स्पर्धेसाठी आयसीसीने १३.८८ मिलियन अमेरिकी डॉलर निश्चित केले आहेत. २०२२ च्या वर्ल्डकप स्पर्धेपेक्षा ही रक्कम चार पट जास्त आहे.
महिला वर्ल्डकप २०२५ चे आयोजन कुठे होणार आहे?
भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये स्पर्धा होणार आहे.
वर्ल्डकपचं तिकीट किती रुपयांना मिळेल?
किमान तिकीट फक्त १०० रुपये असेल.
वर्ल्डकप स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना कुठे होणार आहे?
३० सप्टेंबरला गुवाहाटी येथे उद्घाटनाचा सामना होईल.
पाकिस्तानचे सामने कुठे होणार आहेत?
पाकिस्तान संघाचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.