BCCI Announces Team India Schedule Saam tv
Sports

BCCI कडून टीम इंडियाचं वेळापत्रक जाहीर; अडीच महिन्यात १२ सामने खेळणार भारतीय संघ

BCCI Announces Team India Schedule: भारतीय क्रिकेट संघ यावर्षी वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचे यजमानपद भूषवणार आहे. बीसीसीआयने दोन्ही संघांसोबत खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

Bharat Jadhav

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाचे देशांतर्गत वेळापत्रक जाहीर केलंय. यावर्षी भारत वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचं यजमानपद भूषवणार आहे. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेसोबत भारतीय संघ कधी, कुठे आणि किती सामने खेळणार याची माहिती बीसीसीआयने एका निवेदनाने दिली आहे. ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. भारतासोबत कसोटी मालिका खेळेल.

वेस्ट इंडिजचा हा संघ २०१८ नंतर प्रथमच भारतात कसोटी मालिका खेळण्यासाठी येत आहे. त्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताचा दौरा करणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ टीम इंडियासोबत तिन्ही फॉरमॅटमध्ये मालिका खेळेल. टीम इंडिया या दोन देशांसोबत ७९ दिवसांत एकूण १२ सामने खेळणार आहे.

वेस्ट इंडिजसोबत मालिकेचे वेळापत्रक

वेस्ट इंडिजसोबतच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात २ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर दरम्यान होईल. पहिली कसोटी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. दुसरी कसोटी १० ते १४ ऑक्टोबर दरम्यान कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवली जाईल.

दक्षिण आफ्रिकेसोबत मालिकेचे वेळापत्रक

टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेसोबत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पहिला सामना १४ ते १८ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पहिला कसोटी सामना होणार आहे. दुसरा सामना २२ ते २५ नोव्हेंबर दरम्यान गुवाहाटी येथे होणार आहे.

या मैदानावरील हा पहिलाच कसोटी सामना असणार आहे. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेसोबत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. यानंतर दोन्ही संघ तीन सामन्यांची एकदिवशीय मालिका खेळतील.

ही मालिका ३० नोव्हेंबर पासून सुरू होईल. पहिला सामना रांची येथे होईल. दुसरा सामना रायपूरमध्ये ३ डिसेंबरला होईल. तर तिसरा सामना ६ डिसेंबरला विशाखापट्टणममध्ये खेळला जाईल. यानंतर ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. पहिला सामना ९ डिसेंबरला कटक येथे होईल. दुसरा सामना ११ डिसेंबरला चंदीगडमध्ये, तिसरा सामना १४ डिसेंबरला धर्मशालामध्ये, चौथा सामना १७ डिसेंबरला लखनऊमध्ये आणि शेवटचा सामना १९ डिसेंबरला अहमदाबादमध्ये होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budget Plan: जिओनंतर 'या' कंपनीने दिला धक्का! लोकप्रिय आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन आता बंद

Zodiac signs' fate: ललिता पंचमीमुळे आजचे योग शुभ, जाणून घ्या कोणत्या राशींवर लाभ

Maharashtra Live News Update: पंढरपूरात अतिवृष्टीचा अंदाज, सीना नदीला पुन्हा पुराचा धोका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rainfall: नागरिकांनो सतर्क राहा! आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार, कोकण- विदर्भ अन् मराठवाड्यात जोरदार बॅटिंग

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

SCROLL FOR NEXT