team india saam tv
Sports

BCCI Central Contract: बीसीसीआयकडून सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टची यादी जाहीर! या १६ खेळाडूंची लॉटरी लागली

BCCI Announce Womens Central Contract List: बीसीसीआयकडून २०२४-२५ वर्षासाठी सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टची यादी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान कोणत्या १६ खेळाडूंना स्थान मिळालंय? जाणून घ्या.

Ankush Dhavre

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयकडून दरवर्षी सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्ट मिळालेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली जाते. नुकताच बीसीसीआयने २०२४-२५ वर्षासाठी सेन्ट्रल कॉन्ट्रक्ट मिळालेल्या महिला खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या कॉन्ट्रॅक्टच्या यादीत १६ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

या कॉन्ट्रॅक्टची यादी ए, बी आणि सी अशा ३ कॅटेगरीत विभागण्यात आली आहे. या यादीतील १६ पैकी ३ खेळाडूंना ग्रेड ए मध्ये , ग्रेड बी मध्ये ४ खेळाडूंना आणि ९ खेळाडूंना ग्रेड सी मध्ये जागा देण्यात आली आहे. हा सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्ट १ ऑक्टोबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत असणार आहे.

बीसीसीआयकडून सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टची यादी जाहीर

या यादीत ग्रेड ए मध्ये असलेल्या खेळाडूंबद्दल बोलायचं झालं, तर या यादीत हरमनप्रीत कौर, स्म्रिती मंधांना आणि दीप्ती शर्मा या ३ खेळाडूंचा समावेश आहे. तर ग्रेड बी मध्ये स्थान मिळालेल्या खेळाडूंच्या यादीत रेणुका ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्ज, ऋचा घोष आणि शेफाली वर्मा या ४ खेळाडूंचा समावेश आहे.

तर ग्रेड सी मध्ये श्रेयंका पाटील, यस्तिका भाटीया, राधा यादव, तितास साधु, अरुंधती रेड्डी, अमनज्योत कौर, उमा छेत्री, स्नेह राणा, पुजा वस्त्राकर यांचा समावेश करण्यात आला आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, ग्रेड ए मध्ये असलेल्या हरमनप्रीत कौर, स्म्रिती मंधाना आणि दिप्ती शर्मा यांना प्रत्येकी ५०-५० लाख रुपये दिले जाणार आहेत. तर ग्रेड बी मध्ये असलेल्या जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, ऋचा घोष, रेणुका ठाकूर यांना प्रत्येकी ३०-३० लाख रुपये दिले जातील. तर ग्रेड सी मध्ये असलेल्या सर्व ९ खेळाडूंना प्रत्येकी १०-१० लाख रुपये दिले जाणार आहेत.

महिला खेळाडूंना मिळणारे मानधन हे पुरुषांना मिळणाऱ्या मानधनापेक्षा खूप कमी आहे. पुरुषांची सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टची यादी ही ४ कॅटेगरीत विभागली गेली आहे. ग्रेड ए प्लस कॅटेगरीत असलेल्या खेळाडूंना ७ कोटी रुपये, ग्रेड ए मध्ये असलेल्या खेळाडूंना ५ कोटी रुपये, तर ग्रेड बी मध्ये असलेल्या खेळाडूंना ३ कोटी आणि ग्रेड सी मध्ये असलेल्या खेळाडूंना प्रत्येकी १ कोटी रुपये दिले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

SCROLL FOR NEXT