Indian Cricket Team saam Tv
Sports

Indian Cricket Team Squad : आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा, विराट कोहली संघात

बीसीसीआयकडून टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.

नरेश शेंडे

नवी दिल्ली : भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पाठीच्या दुखापतीमुळं आगामी होणाऱ्या आशिया कप स्पर्धेत खेळणार नसल्याचं निश्चित झालं आहे. २७ ऑगस्टपासून आशिया कप स्पर्धा सुरु होणार असल्याने बीसीसीआयकडून (BCCI) टीम इंडियाची (Indian Cricket Team) घोषणा करण्यात आली आहे. या आशिया कप स्पर्धेत रोहित शर्माकडे कर्णधार म्हणून तर केएल राहुलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे.

'असा' आहे भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन आश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.

जसप्रीत बुमराह आशिया कपमधून बाहेर

बीसीसीआयच्या (BCCI) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना म्हटलं की, जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाल्यामुळे तो आशिया कपमध्ये खेळणार नाही. बुमराह भारताचा मुख्य गोलंदाज आहे. त्याने टी-२० विश्व चषकापूर्वी ठणठणीत होऊन मैदानात उतरावे, अशी आम्ही इच्छा आहे. आम्हाला बुमराहला आशिया कपमध्ये खेळवून धोका पत्करायचा नाही, कारण त्याच्या दुखापतीत आणखी वाढ होऊ शकते.

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लिमिटेड ओव्हर्सच्या सीरिजसाठी बुमराह राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत कंबर कसणार आहे. काही वर्षांपूर्वी बुमराहला अशाच समस्येला सामोरं जावं लागलं होतं. त्यावेळी बुमराह बराचसा कालावधी क्रिकेटपासून दूर होता. पंरत, बुमराह आता संयुक्त राष्ट्र अमेरिकेत आपल्या कुटुंबासोबत सुट्ट्या एन्जॉय करत आहे.

आशिया कपमध्ये सहा संघ घेणार सहभाग

२७ ऑगस्टपासून ११ सप्टेंबर पर्यंत यूएईमध्ये होणाऱ्या आशिया कप २०२२ मध्ये सहा संघ सहभाग घेणार आहेत. श्रीलंका, भारत, बांग्लादेश आणि अफगानिस्तानची याआधीच स्पर्धेत निवड झाली आहे. क्वालिफाईंग टुर्नामेंटनंतर सहाव्या आणि शेवटच्या संघाचा निर्णय होणार आहे. सहा संघाचा क्वालिफाईंग टुर्नामेंट २० ऑगस्टपासून सुरु होणार आहे. यामध्ये हॉंगकॉंग, कुवैत, सिंगापूर आणि यूएईचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT