Ganesh Chaturthi 2022 : गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिका सज्ज; आयुक्तांनी नागरिकांना केले 'हे' आवाहन

यंदाचा गणेशोत्सव मुंबई महापालिकेद्वारे देण्यात आलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन मुंबई आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी केले आहे.
ganesh festival News
ganesh festival News saam tv
Published On

भूषण शिंदे

Mumbai Ganesh Festival News : मुंबई शहरात गणेशोत्सव (Ganesh Festival) हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. मात्र, मागच्या दोन वर्षात कोविडमुळे मुंबईकारांनी (Mumbai) गणेशोत्सव आवश्यक ती काळजी घेऊन साजरा केला. यंदा उत्सवावरील कोरोनाचे निर्बंध हटवल्याने नागरिकांकडून गणेशोत्सव उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव मुंबई महापालिकेद्वारे देण्यात आलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन मुंबई आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी केले आहे.

ganesh festival News
चकरा मारतायत पण पाळणा हलेना; उद्धव ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका

आज मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या उपस्थितीत गणेशोत्सव समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई महानगरपालिकेचे महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच इतरही समित्या, संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई महापालिकेच्या या बैठकीत आतापर्यंत देण्यात आलेल्या मंडप परवानग्या, गणेशोत्सवासंबंधीच्या परवानग्या आदी माहिती बैठकीदरम्यान संगणकीय सादरीकरणाद्वारे देण्यात आली.तसेच कृत्रिम तलावांची आकडेवारी, करण्यात येत असलेले नियोजन इत्यादीची माहिती देखील बैठकीदरम्यान देण्यात आली.

या बैठकीत गणेश विसर्जन मिरवणुकांचे मार्ग हे प्राधान्याने सन -२०१९ नुसार ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये गणेशोत्सवासाठी स्वतंत्र समन्वय अधिकारी नेमण्याचे निर्देश देण्यात आले आहे. महत्त्वाच्या सर्व विसर्जन स्थळी महानगरपालिकेद्वारे वैद्यकीय चाचणी व प्रथमोपचार कक्ष कार्यान्वित करण्यात येणार आहेत. गणेश मूर्ती विसर्जन मार्गांची रस्ते खात्याने काळजीपूर्वक पाहणी करावी व सदर मार्गांवर खड्डे असल्यास ते योग्यप्रकारे भरुन घ्यावेत, असे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी उप आयुक्तांना दिले आहे.

ganesh festival News
विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी कुणाची वर्णी? उपसभापती नीलम गोऱ्हेंना दिलं पत्र

दरम्यान, या बैठकीत मुंबईतील ज्या पुलांवरुन विसर्जन मिरवणुका जातात, त्या पुलांची पाहणी करण्याचे प्रमुख अभियंत्यांना निर्देश देण्यात आले आहे. विसर्जन स्थळी असणाऱ्या फिरत्या शौचालयांची स्वच्छता राखण्यासाठी आवश्यकतेनुसार स्वयंसेवी संस्थांकडून कामगार उपलब्ध देण्यात येणार आहे. रस्त्यांवर केबल लटकत असल्यास त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकांना बाधा येऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन अनधिकृत केबल असल्यास त्या तातडीने हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. भरती - ओहोटीचे वेळापत्रक हे संबंधित विसर्जन स्थळी ठळकपणे लावण्यात येणार आहे. बैठकीच्या अखेरीस यंदाचा गणेशोत्सव हा अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com