चकरा मारतायत पण पाळणा हलेना; उद्धव ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका

आता मी मैदानात उतरलो पळणार नाही, निष्ठा आणि पैसा अशी ही लढाई झालेय - ठाकरे
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Uddhav Thackeray Vs Eknath ShindeSaam TV
Published On

मुंबई: दोन जण दिल्लीला चकरा मारत आहेत पण पाळणा काय हलक नाही; आता बातमी आली कि उद्या विस्तार होणार, पण विस्तार झाल्यावर काय दिवे लावणार असा टोला माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. ते आज मातोश्री येथील पदाधिकाऱ्यांच्या बैठकी दरम्यान बोलत होते.

राज्यातील ठाकरे सरकार कोसळल्यावर शिंदे आणि फडणवीस (Eknath Shinde and Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार अस्तित्वात आलं आहे. मात्र, महिना उलटून गेला तरी अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. याच मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकरवर टीकांचा भडीमार सुरु केला आहे. अशातच आता शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे सराकर टीका केली.

पाहा व्हिडीओ -

आज शिवसेना पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना ठाकरे म्हणाले, गेली अनेक दिवसापासून तुम्ही सगळे जोडले जात आहात. महाराष्ट्राची माती मर्दाला जन्म देते आणि गद्दाराला गाडते. भगव्याच्या पाठीत खंजीर खुपसला आहे त्या गद्दारांचे नामोनिशाण शिल्लक राहिल नाही. मात्र, भगवा तसाच फडकत आहे.

गद्दाराच्या मतदार संघात कमळ फुलवण्याची भाषा केली जात आहे. त्यांच्या लक्षात येईल कसं 'युज अँड थ्रो' केलं जातं. महाराष्ट्राच्या अस्मितेवर कोणी वार करणार असेल तर त्यांचा नायनाट करणं आपलं कर्तत्व ठरणार आहे. तसंच दोनजण दिल्लीत चकरा मारत आहेत. पण पाळणा काय हालत नाही.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
राज्यपालांना ट्विटरवर शिवीगाळ करणं भोवलं; गुन्हे शाखेकडून एकाला अटक

आता बातमी आली की उद्या विस्तार होणार आहे. विस्तार झाल्यावर काय दिवे लावणार त्यांचं त्यांना लखलाभ, आता मी मैदानात उतरलो पळणार नाही. निष्ठा आणि पैसा अशी ही लढाई झालेय. असं म्हणत ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजपवर टीकांचा भडीमार केला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com