राज्यपालांना ट्विटरवर शिवीगाळ करणं भोवलं; गुन्हे शाखेकडून एकाला अटक

शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीला पुढील तपासासाठी मुंबई सायबर सेलकडे सोपवण्यात आले आहे.
Bhagat Singh Koshyari News
Bhagat Singh Koshyari NewsSaam TV
Published On

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना ट्विटरवर शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या सीआययूने एका व्यक्तीला अटक केली आहे. प्रदीप भालेकर असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून, भालेकरला कुरार, मुंबई येथून अटक करण्यात आली आहे.

सध्याच्या काळात सोशल मीडियावरती (Social Media) अनेक नेत्यांना ट्रोल केले जाते. आपल्या विचारधारेच्या विरोधात किंवा आपल्या राजकीय पक्षाच्या विरोधातील भूमिका एखाद्या व्यक्तीने वा नेत्याने घेतल्यास त्याच्या विरोधात टीकांचा भडीमार केला जातो.

पाहा व्हिडीओ -

मात्र, ही टीका करताना अनेकदा ट्रोलर्सकडून मर्यादा पाळल्या जात नाहीत आणि अत्यंत हीन आणि खालच्या शंब्दांमध्ये कॉमेंट केल्या जातात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी सायबर सेल कारवाई करत असतो.

Bhagat Singh Koshyari News
महिलांवरील वाढत्या अत्याचाराला शिंदे सरकार जबाबदार; यशोमती ठाकूर यांची खरमरीत टीका

अशातच आता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना ट्विटरवर (Tweet) शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या सीआययूने एका व्यक्तीला अटक केली आहे. प्रदीप भालेकर या व्यक्तीला मुंबई (Mumbai) येथून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, भालेकरला पुढील तपासासाठी हे प्रकरण मुंबई सायबर सेलकडे (Mumbai Cyber ​​Cell) सोपवण्यात आले असून भालेकर हा मुंबई विकास आघाडी नावाच्या संघटनेचे अध्यक्ष असल्याचे तपासात समोर आलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com