महिलांवरील वाढत्या अत्याचाराला शिंदे सरकार जबाबदार; यशोमती ठाकूर यांची खरमरीत टीका

राज्यातील महिला सुरक्षेवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. यावरून आता काँग्रेसच्या नेत्या, माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
yashomati thakur
yashomati thakur saam tv
Published On

Yashomati thakur news : भंडारा, पुणे यासह राज्यात ठिकठिकाणी महिला व मुलांवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचारांमुळे स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यातील भंडारा, पुणे येथे घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनेवर लोकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर या आरोपींवर कडक कारवाईच्या मागणी केली जात आहे. दुसरीकडे राज्यातील महिला सुरक्षेवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. यावरून आता काँग्रेसच्या नेत्या, माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

yashomati thakur
गोंदिया पुन्हा हादरला; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गर्भपातानंतर मृत्यूशी झुंज

राज्यात ठिकठिकाणी महिला व मुलांवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत, या घटनांच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. अॅड यशोमती ठाकूर म्हणाल्या, 'मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अतिशय बेजबाबदारपणे वागत आहेत. राज्यात कायद्याचा धाक उरलेला नाही. यामुळे राज्यातील महिला व मुलांवर अत्याचार वाढत आहेत. या वाढत्या अत्याचाराला सर्वस्वी शिंदे सरकार जबाबदार आहे'. महाराष्ट्राला बेवारस करून दोघांची दिल्लीवारी सुरू असल्याचा जोरदार टोला काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला आहे.

yashomati thakur
भविष्यात शिवसेनेच्या नादी लागण्याची हिंमत कुणीही करायला नकाे, उद्धव ठाकरे कडाडले

अॅड. ठाकूर पुढे म्हणाल्या की, बहुमत असल्याचा कांगावा करीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दोघांचं सरकार बनवून महाराष्ट्राला अस्थिर करण्याचे काम केलं आहे. राज्याचा कारभार सचिवांच्या हाती सोपवून सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही मान्यवर दिल्लीत असल्याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com