Buldhana : आधी अत्याचार अन् नंतर हत्या ; नदीत आढळला १७ वर्षीय गतिमंद तरुणीचा विवस्त्र मृतदेह

Buldhana Crime News : बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवस्त्र मृतदेह नदीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात अत्याचारानंतर हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
Buldhana : आधी अत्याचार अन् नंतर हत्या ; नदीत आढळला १७ वर्षीय गतिमंद तरुणीचा विवस्त्र मृतदेह
Buldhana Crime NewsSaam tv
Published On
Summary
  • १७ वर्षीय मुलीचा विवस्त्र मृतदेह नदीत आढळला

  • मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता होती

  • अत्याचारानंतर हत्या झाल्याचा प्राथमिक संशय

  • पोलिसांकडून सखोल तपास आणि पोस्टमार्टम सुरू

बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोताळा तालुक्यातील बोराखेडी शिवारामध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन गतिमंद मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत नदीच्या पाण्यावर तरंगताना आढळला . प्राथमिक अंदाजानुसार तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलीस सखोल तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाण्यातील मोताळा येथील प्रशासकीय इमारतीच्या पाठीमागच्या गिट्टी खदान जवळ असलेल्या परिसरात सदर घटना घडली आहे. मोताळा तालुक्यातील बोराखेडी शिवारामध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन गतिमंद मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत नदीच्या पाण्यावर तरंगताना नागरिकांना आढळला. याविषयी ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना कळवले.

Buldhana : आधी अत्याचार अन् नंतर हत्या ; नदीत आढळला १७ वर्षीय गतिमंद तरुणीचा विवस्त्र मृतदेह
Kalyan News : खळबळजनक! कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात आढळला महिलेचा मृतदेह, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. त्यानंतर तिची हत्या करून तिला या नदीत टाकल्याचे म्हटले.

Buldhana : आधी अत्याचार अन् नंतर हत्या ; नदीत आढळला १७ वर्षीय गतिमंद तरुणीचा विवस्त्र मृतदेह
Chennai Beach Accident : चेन्नईच्या बीचवर महाराष्ट्रातील ३ जण वाहून गेले, एका मुलीचा मृत्यू, एकजण बेपत्ता, सुदैवानं एक बचावला

याप्रकरणी आता बोराखेडी पोलिसांनी तपास सुरू केलं असून पोस्टमार्टम तसेच तांत्रिक बाबींच्या आधारे तपास केलाय जात आहे. गतिमंद मुलगी दोन दिवसापासून घरातून बेपत्ता होती. मात्र सर्वत्र शोध घेत असताना तिचा मृतदेही आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com