अकोला : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभरात सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 'हर घर तिरंगा'अभियान देशभरता राबवण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे. भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. परंतु, मोदी यांनी सुरु केलेल्या 'हर घर तिरंगा'अभियानाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आक्षेप घेतला आहे. झेंड्याचं कंत्राट (Gujrat) गुजरातकडेच कसं ? असा सवाल उपस्थित करत मिटकरींनी मोदींवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. घरावर नुसता तिरंगा फडकावून चालत नाही, असं म्हणत मिटकरींनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Independence amrut mahotsav) संपूर्ण देशभरात सुरु असून केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी नागरिकांसाठी चांगली बातमी दिली. भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 'प्रत्येक घरी तिरंगा' असं आवाहन केल्यानंतर देशभरात उत्सव सूरु आहे. हा उत्सव १३ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. अशातच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला.भारतीय पुरातत्व विभागाकडून सर्व स्मारक, पुरातत्व ठिकाणे आणि संग्रहालये १५ ऑगस्टपर्यंत पर्यटकांना मोफत पाहता येणार आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशभक्तीचा गजर सुरु राहावा, या उद्देशाने केंद्र सरकारने ही घोषणा केली.या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात नागरिकांमध्ये भारत देशाप्रती प्रेमाची भावना अधिक वाढावी,यासाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली.भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाकडून सर्व स्मारक,पुरातत्व विभाग आणि संग्रहालये पर्यटकांना मोफत पाहता येणार आहेत. १५ ऑगस्ट पर्यंत सर्व नागरिकांना केंद्र सरकारच्या या सुविधेचा लाभ मिळणार आहे.
Edited By - Naresh Shende
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.