Champions Trophy  Saam tv
Sports

Team India: वर्ल्ड चॅम्पियन्स मालामाल! टीम इंडियासाठी BCCI कडून तब्बल इतक्या कोटींचं बक्षीस जाहीर

BCCI Prize Money For Champions Trophy Winning Team : भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलमध्ये न्यूझीलंडला पराभूत केलं होतं. आता बीसीसीआयने बक्षिसाची घोषणा केली आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघाचा आयसीसीच्या स्पर्धांमध्ये दबदबा पाहायला मिळाला आहे. आधी आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन भारतीय संघाने दुसऱ्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावली.

तर काही दिवसांपूर्वीच झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलमध्ये न्यूझीलंडला पराभूत करत भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीत विजेता होण्याचा मान पटकावला. भारताच्या विजयानंतर जगभरातून खेळाडूंवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. दरम्यान आता बीसीसीआयने खेळाडूंसाठी बक्षिसाची घोषणा केली आहे.

बीसीसीआयकडून खेळाडूंना बक्षीस जाहीर

भारतीय संघाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयानंतर बीसीसीआयने ५८ कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे. ही रक्कम खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांमध्ये विभागली जाणार आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघाने दमदार खेळ केला. या स्पर्धेत भारताने एकही सामना गमावला नव्हता.

सुरुवातीला बांगलादेश, पाकिस्तान आणि शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडला पराभूत केलं. त्यानंतर सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि फायनलमध्ये पुन्हा एकदा न्यूझीलंडला पराभूत करुन जेतेपदाचा मान मिळवला.

भारताच्या विजयानंतर बक्षिसाची घोषणा करताना बीसीसीआय अध्यक्ष म्हणाले की, 'सलग आयसीसीच्या ट्रॉफी जिंकणं खूपच स्पेशल आहे.' तसेच बीसीसीआयचे सचिव म्हणाले,' बीसीसीआयकडून खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना गौरविण्यात येत आहे, याचा बीसीसीआयला अभिमान आहे.

वर्ल्ड क्रिकेटमध्ये भारतीय संघाने आपला दबदबा निर्माण केला आहे. भारतीय संघ मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये अव्वल दर्जाचा संघ आहे आणि हे या विजयाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

रोहितच्या नेतृत्वात रचला इतिहास

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने इतिहास रचला आहे. यापूर्वी भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतही भारतीय संघाने सर्व सामने जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

त्यानंतर अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतही भारतीय संघाने सर्व सामने जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला आणि फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. आता चॅम्पियन्स ट्रॉफीतही भारताने सर्व सामने जिंकून फायनलमध्ये न्यूझीलंडला पराभूत केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टॅरिफनंतर भारताला आणखी एक धक्का, अमेरिकेनं घेतला मोठा निर्णय, लाखो लोकांवर थेट परिणाम

Passport Free Travel : या देशात फिरण्यासाठी लागणार नाही पासपोर्ट, भारतापेक्षाही कमी असेल खर्च

Pune: विसर्जन मिरवणुकीत भयंकर घडलं; महिला पत्रकाराचा विनयभंग, ढोल ताशा पथकाच्या सदस्यावर आरोप

Maharashtra Live News Update: पुण्यात ढोल ताशा पथकातील सदस्याकडून महिला पत्रकाराचा विनयभंग

Ankita Walawalkar: बिग बॉस मराठीमधून प्रसिद्ध झालेल्या अंकिता वालावलकरचं वय किती?

SCROLL FOR NEXT