litton das  yandex
क्रीडा

IND vs BAN: बांगलादेशी फलंदाज भारताला घाबरला, मालिकेआधीच म्हणाला...

Ankush Dhavre

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १९ सप्टेंबरपासुन सुरु होणार आहे. बांगलादेशचा संघ काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानलाच हरवून आला आहे.

त्यामुळे बांगलादेश संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे. मात्र ही मालिका सुरु होण्यापूर्वी बांगलादेश संघातील खेळाडू लिटन दासने एक मोठी चिंता व्यक्त केली आहे. काय आहे कारण? जाणून घ्या.

काय आहे कारण?

भारतात कसोटी क्रिकेट खेळणं जरा जास्त कठीण आहे, असं म्हणतात. यामागचं प्रमुख कारण म्हणजे, भारतात कसोटी क्रिकेटमध्ये एसजीचा चेंडू वापरला जातो. तर इतर देशांमध्ये खेळताना कुकाबूराचा वापर केला जातो.

आता दोघांमधला फरक काय? हे आधी समजून घ्या. दोन्ही चेंडूंच्या सीममध्ये फरक असतो. कुकाबूराचा चेंडू ज्यावेळी जुना होतो, त्यावेळी तो फलंदाजांसाठी तितका आव्हानात्मक नसतो. मात्र एसजीच्या चेंडूच्या बाबतीत जरा उलट आहे.

काय म्हणाला लिटन दास?

इएसपीएनक्रीकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, लिटन दास म्हणाला,' भारतात वेगळ्या चेंडूचा वापर केला जातो. एसजीच्या चेंडूविरुद्ध फलंदाजी करणं जरा कठीण आहे. इतर देशांमध्ये कुकाबूरा चेंडूचा वापर केला जातो. मात्र भारतात खेळताना एसजी चेंडूचा वापर केला जातो. कुकाबूराचा चेंडू जुना झाल्यानंतर खेळणं सोपं होऊन जातं. मात्र एसजीचा चेंडू जुना झाल्यानंतर फलंदाजी करणं आणखी कठीण होऊन जातं.'

भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी बांगलादेश संघाची घोषणा

नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, जाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन,नईम हसन, नाहिद राणा, हसन महमूद, तस्कीन अहमद, सैयद खालिद अहमद, जेकर अली अनिक, लिटन दास, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jitada Fish : चविष्ट 'जिताडा' समुद्रातून होतोय गायब, मच्छिमारांच्या हातीही लागेना; काय आहे कारण? पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Updates : वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने, घटनास्थळी पोलीस तैनात

Maharastra Politics : साखरपट्टा महायुतीला कडू? शरद पवारांच्या डावाने सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढलं? वाचा सविस्तर

Maharashtra Politics: मविआची 80 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण, विदर्भात तिढा कायम; VIDEO

Mumbai Senate Election : मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित, कारण काय? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT