babar azam saam tv
Sports

Babar Azam: झिम्बाब्वे दौऱ्यातून बाबर आझमची हकालपट्टी! या खेळाडूकडे नेतृत्वाची धुरा

Pakistan New Captain : झिम्बाब्वेविरुद्ध होणाऱ्या मालिकेतून बाबर आझमला विश्रांती देण्यात आली आहे. तर स्टार खेळाडूकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.

Ankush Dhavre

New Captain Of Pakistan: पाकिस्तान क्रिकेट संघात एकापाठोपाठ एक मोठे बदल पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाबर आझमला संघाबाहेर करण्यात आलं होतं. बाबरने काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या वनडे आणि टी -२० संघाच्या कर्णधारपदावरून माघार घेतली होती.

त्यामुळे पाकिस्तानने आता नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. पाकिस्तान येत्या काही दिवसात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी मोहम्मद रिझवानची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

पाकिस्तानला मिळाला नवा कर्णधार

पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे नवे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी एका पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. मोहम्मद रिझवान हा पाकिस्तानचा नवा कर्णधार असणार आहे.

यासह सलमान आगाकडे उप कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तो ऑस्ट्रेलिया दौद्यापासून ही जबाबदारी स्वीकारणार आहे. तर झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी सलमान आगा संघाचं नेतृत्व करताना दिसून येईल.

बाबरला विश्रांती

पाकिस्तानचा संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी बाबर आझमला संघात स्थान देण्यात आलेलं नाही. तो संघातील प्रमुख फलंदाज आहे. मात्र तरीदेखील त्याला दुर्लक्ष केलं गेलं आहे. तर मोहम्मद रिझवान हा पहिल्यांदाच पाकिस्तानचं नेतृत्व करताना दिसेल.

यापूर्वी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाचं नेतृत्व केलं आहे. मात्र मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नेतृत्व करण्याची ही त्याची पहिलीच वेळ असेल. त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये नेतृत्व करण्याचा चांगलाच अनुभव आहे. यासह पाकिस्तान सुपर लीगमध्येही तो नेतृत्व करताना दिसून आला आहे.

मोहम्मद रिझवानच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने आतापर्यंत ७४ वनडे सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने २०८८ धावा केल्या आहेत. तर १०२ टी -२० सामन्यांमध्ये त्याने ३३१३ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात रस्त्याच्या मागणीसाठी तीन गावातील गावकऱ्यांचे आमरण उपोषण

Amla For Hair: आवळ्याचा केसांवर कोणता परिणाम होतो?

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

SCROLL FOR NEXT