सध्या पाकिस्तान विरूद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये २ सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवण्यात येतेय. यामधील पहिला सामना २१ ऑगस्टपासून सुरु झाला असून रावळपिंडीमध्ये पाकिस्तानच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केल्याचं दिसून आलं. यावेळी पाकिस्तानचा विकेटकीपर फलंदाज मोहम्मद रिझवानने नाबाद १७१ रन्सची खेळी केली. दरम्यान पाकिस्तानचा पहिला डाव घोषित केल्यानंतर मोहम्मद रिझवानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. यामध्ये तो बाबर आझम समोर बॅट फेकताना दिसतोय.
रावळपिंडी टेस्टमध्ये पाकिस्तानचे पहिले तीन विकेट्स अवघ्या १६ रन्सवर पडले होते. पाकिस्तान इतक्या कठीण परिस्थितीत असून सुद्धा सौद शकील आणि मोहम्मद रिझवान यांनी पाचव्या विकेटसाठी 261 रन्सची उत्कृष्ट पार्टनरशिप केली. पाकिस्तानने 448 धावांवर डाव घोषित केला आणि रिजवान 171 धावा करून नाबाद परतला. यावेळी रिझवान पॅव्हेलियनमध्ये परतत असताना त्याने बॅट बाबर आझमच्या दिशेने फेकली. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
सोशल मीडियावर बांग्लादेश विरूद्ध पाकिस्तान यांच्या सामन्यातील व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये मोहम्मद रिझवान १७१ रन्सची इनिंग खेळून पॅव्हेलियनमध्ये परतताना दिसतोय. यावेळी बाबर आझम बाऊंड्री लाईनजवळ उभा आहे. तर पव्हेलियनमध्ये परतत असतात रिझवानने बाबरच्या दिशेने बॅट हवेत फेकल्याचं दिसून येतंय.
दरम्यान हे दोघंही एकमेकांसोबत मस्ती करताना दिसत होते. यावेळी रिझवानच्या या उत्तम खेळीबद्दल बाबर आझम त्याच्यासाठी टाळ्या वाजवताना दिसला. याशिवाय टीममधील इतर खेळाडूंनी देखील त्याच्या कामाचं कौतुक केलं आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात बाबर शून्य धावांवर बाद झाला होता, त्यामुळे त्याला खूप ट्रोल व्हावे लागले होते. दुसरीकडे बाबर आझम शून्यावर बाद झाल्यामुळे त्याच्यावर मात्र टीकेची झोड उठवण्यात येतेय.
सामना सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद याने शेवटच्या दिवसांमध्ये पीच खूपच स्लो होणार असण्याची शक्यता वर्तवली होती. खेळपट्टीवर भरपूर गवत आहे आणि पावसामुळे खेळपट्टी खरोखरच स्लो झाल्याचं दिसून येतंय. दरम्यान ही परिस्थिती बांगलादेशी फलंदाजांसाठी फारशी अनुकूल ठरलेली दिसली नाही.
पाकिस्तान टीमतील फलंदाज मोहम्मद रिझवान (Mohammed Rizwan) आपलं दुहेरी शतक पूर्ण करण्याच्या वाटेवर होता. त्याला आपलं दुहेरी शतक पूर्ण करण्यासाठी त्याला अवघ्या २९ रन्सची आवश्यकता होती. पुढच्या दोन-तीन ओव्हरमध्ये त्याने मोठे फटके खेळून त्याने डबल सेंच्युरी पूर्ण केली असती. मात्र पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने डाव घोषित केल्याने रिझवानचं दुहेरी शतक हुकलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.