बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३६७ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्ताननेही दमदार सुरुवात केली. मात्र दिलेलं आव्हान पूर्ण करण्यापूर्वीच पाकिस्तानचा डाव संपुष्टात आला. दरम्यान या सामन्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने मोठं आव्हान केलं आहे.
या सामन्यानंतर बोलताना बाबर आझम म्हणाला की, ' आम्हाला हवी तशी गोलंदाजी करता आली नाही. आम्ही डेव्हिड वॉर्नरसारख्या फलंदाजाचा झेल सोडला. त्याच्यासारख्या फलंदाजाला जीवदान दिलं तर तो सोडणार नाही. हे मैदान धावा करण्यासाठी योग्य होतं. इथे चूक व्हायला नको होती. आम्हाला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करायची होती. ' (Babar Azam Statement)
सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा
तसेच तो पुढे म्हणाला की, ' मधल्या षटकांमध्ये आम्हाला भागीदारी करता आली नाही. आम्हाला मधल्या षटकांमध्ये चांगली फलंदाजी करावी लागणार आहे.'
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, पाकिस्तानला या सामन्यात ५० षटक अखेर ३६७ धावा करायच्या होत्या. डेव्हिड वॉर्नरने १२४ चेंडूंचा सामना करत सर्वाधिक १६३ धावा चोपल्या. यादरम्यान त्याने १४ चौकार आणि ९ षटकार मारले. (Latest sports updates)
तर मिचेल मार्शने १०८ चेंडूंचा सामना करत १२१ धावा केल्या. यादरम्यान त्याने १२१ धावा केल्या. या दोघांना सोडलं तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.दरम्यान पाकिस्तान संघाकडून गोलंदाजी करताना शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक ५ गडी बाद केले.
या डोंगराइतक्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानने ही दमदार सुरुवात केली. सलामी जोडीने शतकी भागीदारी केली.
मात्र त्यानंतर लोअर मिडल ऑर्डरला टीचून फलंदाजी करता आली नाही. त्यामुळे पाकिस्तानचा डाव गडगडला. पाकिस्तानला हा सामना ६२ धावांनी गमवावा लागला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.