World Cup 2023: दिलदार मनाचा जडेजा! मेडल जिंकताच केलं असं काही...,Video पाहून वाटेल अभिमान

Ravindra Jadeja Viral Video: मेडल मिळाल्यानंतर रविंद्र जडेजाने मन जिंकणारं वक्तव्य केलं आहे.
ravindra jadeja
ravindra jadejasaam tv news
Published On

Ravindra Jadeja Viral Video:

वर्ल्डकप स्पर्धेतील १७ वा सामना भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सलग चौथा विजय मिळवला. या विजयात जितकं योगदान फलंदाज आणि गोलंदाजांचं आहे, तितकंच योगदान क्षेत्ररक्षकांचही आहे.

भारतीय क्षेत्ररक्षकांनी एक डझनहून अधिक धावांचा बचाव केला. दरम्यान भन्नाट झेल टिपणाऱ्या रविंद्र जडेजाची सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून निवड करण्यात आली.

या सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षकांनी दमदार क्षेत्ररक्षण केलं. तर झालं असं की, मुश्फिकुर रहीमने पॉइंटच्या दिशेने शॉट मारला. त्यावेळी पॉइंटला क्षेत्ररक्षण करत असलेल्या रविंद्र जडेजाने वाऱ्याच्या वेगाने आणि चित्ताच्या चपळाइने डाइव्ह मारत भन्नाट झेल टिपला.

हा झेल टिपण्यापूर्वी यष्टीरक्षण करत असलेल्या केएल राहुलने देखील डाव्या बाजुला डाइव्ह मारत भन्नाट झेल टिपला होता. त्यामुळे या दोघांमध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मेडल मिळवण्यासाठी चुरशीची लढत सुरू होती. अखेर यष्टीरक्षक प्रशिक्षकांनी रविंद्र जडेजाची सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून निवड केली आणि त्याला मेडल दिलं.

ravindra jadeja
IND vs BAN, Virat Kohli Record: किंग कोहलीच्या शतकी खेळीनं मोडला श्रीलंकेच्या दिग्गजाचा रेकॉर्ड! सचिनचा 'महारेकॉर्ड' रडारवर

सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं नाव जाहीर करताच ड्रेसिंग रूममध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. केएल राहुल आणि रविंद्र जडेजा या दोघांमध्ये चुरशीची लढत सुरू होती. अखेर यष्टीरक्षक प्रशिक्षकांनी रविंद्र जडेजाला मेडल दिलं. केएल राहुलला हे मेडल देण्याचा मान देण्यात आला.

ज्यावेळी हे मेडल दिलं जात होतं त्यावेळी स्टेडियमवरील मोठ्या स्क्रीनवर रविंद्र जडेजाने टिपलेल्या झेलचा व्हिडिओ दाखवण्यात आला. हा व्हिडिओ प्ले होताच खेळाडू जल्लोष साजरा करताना दिसून आले. हे मेडल जडेजाने काढलं आणि यष्टीरक्षक प्रशिक्षक टी दिलीपच्या गळ्यात घातलं. त्याच्या या कृत्याचं जोरदार कौतुक होतंय. (Latest sports updates)

ravindra jadeja
Virat Kohli Century : विराटच्या विक्रमी शतकात अंपायरचा वाटा?, त्या निर्णयाची जोरदार चर्चा; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, बांगलादेशने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने २५६ धावा केल्या होत्या.

या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक १०३ धावांची खेळी केली. यासह भारतीय संघाने या सामन्यात ७ गडी राखून विजय मिळवला. यासह भारतीय संघाने या स्पर्धेतील सलग चौथा विजय मिळवला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com