Axar Patel  Google
Sports

IPL 2025 : अखेर दिल्लीचा कर्णधार ठरला; राहुल-फाफ नव्हे तर 'बापू'कडे जबाबदारी

Delhi Capitals : आयपीएलच्या १८ व्या हंगामाला आठवड्याभरात सुरूवात होणार आहे, त्याआधी दिल्लीने कर्णधाराची निवड केली आहे. अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याच्याकडे दिल्लीची कमान सोपवण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar

Delhi Capitals Appoint Axar Patel As Captain : दिल्ली कॅपिटल्सने अखेर आपल्या कर्णधाराचे नाव जाहीर केलेय. केएल राहुल याने कर्णधारपद स्वीकारण्यास नकार दिला. दिल्लीने संघाची धुरा बापू अर्थात अक्षर पटेल याच्याकडे सोपवली आहे.

अष्टपैलू अक्षर पटेल याच्या नावाची घोषणा आज दिल्ली कॅपिटन्सकडून करण्यात आली आहे. याआधी ऋषभ पंत दिल्लीचा कर्णधार होता. पण आयपीएल लिलावाच्या मेगा ऑक्शनआधी पंतला दिल्लीने रिलीज केल होते. लिलिवात पंतला लखनौ जायंट्सने खरेदी केले. त्यामुळे दिल्लीने आता अक्षर पटेल याच्या खांद्यावर जबाबदारी सोपवली आहे.

केएल राहुलचा नकार -

लिलावात दिल्लीने केएल राहुल, फाफ ड्युप्लेसिस यासारख्या दिग्गज फलंदाजांना ताफ्यात घेतलं होते. दिल्लीची धुरा राहुलकडे येईल, असे म्हटले जात होते. पण राहुलनेच कर्णधारपद स्विकारण्यास नकार दिला. त्यानंतर दिल्लीने फाफच्या नावाचा विचार केला, पण भविष्याचा विचार करून अक्षर पटेल याच्या खांद्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. दिल्लीकडून आज एक्सवर एक व्हिडीओ पोस्ट करत अक्षर पटेल याच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

अक्षर पटेल याचे आयपीएल करिअर

अक्षर पटेल आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या आधी पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्सचा सदस्य राहिला आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत १५० सामने खेळले आहे. अक्षरने आपल्या अष्टपैलू खेळीने अनेकदा सामना फिरवला आहे. अक्षरने १३१ च्या स्ट्राईक रेटने १६५३ धावा केल्या आहेत.त्याशिवाय १२३ विकेटही घेतल्या आहेत.

कोणत्या संघाचा कोण कर्णधार -

मुंबई - हार्दिक पांड्या

चेन्नई - ऋतुराज गायकवाड

आरसीबी - रजत पाटीदार

गुजरात - शुभमन गिल

पंजाब - श्रेयस अय्यर

लखनौ - शुभमन गि

कोलकाता - अजिंक्य रहाणे

राजस्थान - संजू सॅमसन

हौदराबाद - पॅट कमिन्स

दिल्ली - अक्षर पटेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना फटका

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

SCROLL FOR NEXT