axar patel twitter
Sports

Axar Patel: अक्षर पटेलच्या 'ड्रीम बॉल'वर बेअरस्टोची दांडी गुल! Video व्हायरल

Axar Patel- Jonny Bairstow: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीत अक्षर पटेलने जॉनी बेअरस्टोची दांडी गुल केली आहे.

Ankush Dhavre

Axar Patel Clean Bowled Jonny Bairstow:

अक्षर पटेलला कसोटी क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे. तेव्हा त्याने स्वत:ला सिद्ध करुन दाखवलं आहे. नुकताच भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातही त्याच्या गोलंदाजीची जादू पाहायला मिळत आहे.

त्याने हैदराबाद कसोटीतील पहिल्या डावात जॉनी बेअरस्टोची दांडी गुल करत माघारी धाडलं आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सुरुवातीला फायदेशीर ठरला. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कमबॅक केलं आणि इंग्लंडला पूर्णपणे बॅकफुटवर ढकललं. ५२ षटकात १६५ धावांवर इंग्लंडचे ७ फलंदाज माघारी परतले होते.

जॉनी बेअरस्टो या डावात पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. त्याने सुरुवातीला चांगली फलंदाजी केली. मात्र तो फार काळ मैदानावर टीकू शकला नाही. बेअरस्टो ५८ चेंडूत ३७ धावा करत असताना बाद होऊन माघारी परतला. (Cricket News In Marathi)

अक्षरच्या ड्रीम बॉलवर बेअरस्टोची दांडी गुल..

तर झाले असे की, भारतीय संघाची गोलंदाजी सुरु असताना ३३ वे षटक टाकण्यासाठी अक्षर पटेल गोलंदाजीला आला होता. या षटकातील चौ थ्या चेंडूवर अक्षर पटेलने बेअरस्टोला क्लिन बोल्ड केलं. त्याने टाकलेला चेंडू टप्पा पडताच इतका फिरला की, बेअरस्टोला काही कळालच नाही. त्याचा हा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारतीय संघाने या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा संपूर्ण डाव २४६ धावांवर संपुष्टात आला. यादरम्यान अक्षर पटेलने २ गडी बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT