इंदूरमध्ये कॅफेत जाताना ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूच्या खेळाडूंचा विनयभंग झाल्याची घटना घडली.
आरोपीने दुचाकीवरून ऑस्ट्रेलियन खेळाडूचा पाठलाग केला. त्यानंतर खेळाडूला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे.
Women’s World Cup 2025 : महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सेमीफायनलमध्ये स्थान पक्क केलेल्या ऑस्ट्रेलिया संघासोबत धक्कादायक घटना घडली. २३ ऑक्टोबर रोजी कॅफेत जाताना दोन ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचा विनयभंग झाल्याचा प्रकार घडला. त्यानंतर या प्रकाराची माहिती महिला खेळाडूंनी सुरक्षा अधिकाऱ्यांना दिली. पुढे ऑस्ट्रेलिया संघाचा सुरक्षा मॅनेजर डॅनी सिमन्स यांनी एमआयजी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांत गुन्हा दाखल होताच आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
ऑस्ट्रेलिया महिला संघाच्या खेळाडू रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. पीटीआय रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितलं की, २३ ऑक्टोबर रोजी सकाळी खजराना रोड भागात झालेल्या प्रकरणात आरोपी अकील खानला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही महिला क्रिकेटपटू हॉटेलमधून बाहेर निघाल्या. त्यानंतर एका कॅफेत चालल्या होत्या. त्यानंतर आरोपी अकील दुचाकीने पाठलाग करत होता. खेळाडूंनी सांगितलं की, आरोपीने एका महिला क्रिकेटपटूला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून पळ काढला. त्यानंतर दोन्ही महिला क्रिकेटपटूंनी सुरक्षा अधिकारी डॅनी सिमन्सला संपर्क केला. त्यांनी पुढे सुरक्षा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनास्थळी पोहोचले.
सूचना मिळाल्यानंतर सहायक पोलीस आयुक्त हिमानी मिश्रा यांनी दोन्ही महिला खेळाडूंशी चर्चा केली. त्यांच्या विधानावरून पोलिसांत गुन्हा नोंदवला. एका प्रत्यक्षदर्शीच्या संशयावरून दुचाकीचा नंबर देखील नोंदवून घेतला आहे.त्याच आधारावरून आरोपी अकील खानला ताब्यात घेतलं आहे. या प्रकारानंतर ऑस्ट्रेलिया संघाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने एकही सामना गमावला नाही. ऑस्ट्रेलियाच्या संघाने सेमीफायनलमध्ये स्थान पक्क केलं आहे. ऑस्ट्रेलियाने स्पर्धेत एकूण ६ सामने खेळले आहेत. त्यातील ५ सामने जिंकले आहेत. तर ६ वा सामना पावसामुळे ड्रॉ झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.