Maharashtra Government : फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; मच्छीमारांना मिळणार वीज सवलत, फक्त ठेवली महत्वाची अट

devendra fadnavis News : फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतलाय. आता शेतकऱ्यासारखी मच्छीमारांनाही वीज सवलत मिळणार आहे.
Maharashtra Government news
devendra fadnavis News saam tv
Published On
Summary

फडणवीस सरकारने मच्छीमारांसाठी वीज सवलत जाहीर

नितेश राणे यांच्या मागणीनंतर शासनाचा निर्णय जाहीर

मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा मिळाल्याने सवलत लागू केली आहे

नोंदणीकृत मच्छीमारांनाच या योजनेचा लाभ मिळणार

मुंबई : फडणवीस सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता शेतकऱ्यांप्रमाणे मच्छिमारांनाही वीज सवलत मिळणार आहे. मंत्री नितेश राणे यांच्या मागणीनुसार शासनाकडून निर्णय जारी करण्यात आला आहे. मत्स व्यवसायाला कृषी दर्जा मिळाल्यामुळे वीज सवलत लागू झाली आहे.

महाराष्ट्र सरकारने मच्छिमारांना वीज सवलत लागू करून त्यांची दिवाळी गोड केली आहे. सरकारच्या निर्णयानुसार मच्छीमार, मत्स्य संवर्धक,मत्स्य व्यावसायिक, मत्स्यकास्तकार यांना ही सवलत लागू होईल. सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रकल्पाची एनएफडीबी अंतर्गत नोंदणी आवश्यक आहे. त्यामुळे वीज सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी मच्छिमारांना तातडीने नोंदणी करावी लागणार आहे.

Maharashtra Government news
Gold price : अवघ्या ६ मिनिटात सोनं ७,७०० रुपयांनी स्वस्त; सोन्याच्या दरात वर्षभरातील सर्वात मोठी घसरण

वीजदर सवलत कोणत्या घटकासाठी मिळणार?

सरकारची वीज सवलत ही मच्छिमार,मत्स्यकास्तकार मत्स्यउत्पादक, मत्स्यव्यवस्थापन, मत्स्यबीज संवर्धक, मत्स्यबोटुकली संवर्धन करणारे घटक, Post Harvesting यामध्ये वर्गीकरण, प्रतवारी, आवेष्ठन, साठवणूक करणाऱ्या घटकांना ही वीज सवलत मिळेल. या घटकांना कृषी दराप्रमाणे वीजदरात सवलत लागू करण्याची बाब सरकारच्या विचाराधीन होती.

Maharashtra Government news
Maharashtra Politics : सत्ताधारी आमदारांना विकासनिधी की खैरात; निवडणुका जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी, वाचा स्पेशल रिपोर्ट

योजनेच्या लाभासाठी अटी आणि शर्ती काय?

वीजदरात सवलत लाभार्थ्याने स्वसत्यापन (Self- Attestation) मिळण्यासाठी सहाय्यक आयुक्त (मत्स्यव्यवसाय) संबंधित जिल्हास्तर यांच्याकडे अर्ज सादर करावा लागेल.

मत्स्यव्यवसाय प्रकल्प NFDB अंतर्गत नोंदणीकृत असणे गरेजेचे असणार आहे.

अवसायनात गेलेले प्रकल्प या वीज सवलतीस पात्र ठरणार नाहीत.

सदर योजनेत सवलतीने मिळणाऱ्या वीजेचा गैरवापर झाल्याचे निदर्शनास आल्यास यापूर्वी दिलेल्या सवलतीची रक्कम दंडनीय व्याजासह वसूल करण्यात येईल, असे सरकारने स्प्टष्ट केलेय. यासाठी हमीपत्र संबंधित मत्स्यव्यवसाय विभागाने सादर करणे बंधनकारक राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com