rohan bopanna saam tv news
Sports

Australian Open: रोहन बोपन्नाने रचला इतिहास!मेन्स डबल्सच्या फायनलमध्ये धडक

Rohan Bopanna News In Marathi: ऑस्ट्रेलियन ओपन २०२४ स्पर्धेत भारताचा स्टार खेळाडू रोहन बोपन्नाचा जलवा पाहायला मिळत आहे.

Ankush Dhavre

Rohan Bopanna News: 

ऑस्ट्रेलियन ओपन २०२४ स्पर्धेत भारताचा स्टार खेळाडू रोहन बोपन्नाचा जलवा पाहायला मिळत आहे. हा ४३ वर्षीय खेळाडू आपला पहिला ग्रँडस्लॅम जिंकण्यापासून केवळ १ पाऊल दूर आहे. रोहन बोपन्ना आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार मॅथ्यू एबडेन या जोडीने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या मेन्स डबल्सच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

रोहन बोपन्नाने रचला इतिहास..

रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडेन या जोडीने सेमीफायनलच्या सामन्यात थॉमस माचाक आणि झांग झिंझेन या जोडीला धूळ चारली. सेमीफायनमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत ६-३,३-६,७-६ (१०-७) ने पराभूत केलं आहे. २ तास चाललेल्या या सामन्यात शेवटी टायब्रेकरमध्ये रोहन बोपन्नाचा अनुभव कामी आला. (Tennis News In Marathi)

इतिहास रचण्यापासून केवळ एक पाऊल दूर..

रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडेन या जोडीने क्वार्टरफायनल जिंकताच मेन्स डबल्सच्या रँकिंगमध्ये मोठा कारनामा मोठी झेप घेतली. ही जोडी सध्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. या जोडीने दमदार सुरुवात करत चांगल्या सर्व्हिस केल्या.

यापूर्वी २०१३ आणि २०२३ मध्ये झालेल्या अमेरिकन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. आता वयाच्या ४३ व्या वर्षी त्याला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे.

क्वार्टर फायनलमध्ये शानदार विजय..

क्वार्टरफायनलमध्ये रोहन बोपन्ना- मॅट एबडेन या जोडीने आंद्रेस मोलटेनी -मॅक्सिमो गोंजालेज या जोडीवर ६-४,७-६ (७-५) असा विजय मिळवला. आता रोहन बोपन्ना आणि एबडेन या जोडीचं संपूर्ण लक्ष फायनल सामन्यावर असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT