Australian Open: ४४ वर्षीय बोपन्नाने इतिहास रचला! ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनलमध्ये धडक; मेन्स डबल्सच्या नंबर १ स्थानी कब्जा

Rohan Bopanna Enters In Australian Opens Semi Final: रोहन बोपन्ना आणि मॅट एबडेन या जोडीने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत दमदार खेळ करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.
rohan bopanna
rohan bopannatwitter
Published On

Australian Open 2024 News In Marathi:

भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपन्नाने इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत रोहन बोपन्ना आणि मॅट एबडेन या जोडीने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत दमदार खेळ करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

४४ वर्षीय रोहन बोपन्ना आणि मॅट एबडेन या जोडीने क्वार्टरफायनलच्या सामन्यात ६-४,७-६ (७-५) ने विजय मिळवत सेमीफायनलचं तिकीट मिळवलं आहे. या विजयासह या जोडीने आणखी एक मोठा कारनामा केला आहे. रोहन बोपन्ना आणि मॅट एबडेन ही जोडी मेन्स डबल्सच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचली आहे.

क्वार्टरफायनलमध्ये जोरदार विजय..

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील क्वार्टरफायनलमध्ये अर्जेंटीनाचे आंद्रेस मोलटेनी -मॅक्सिमो गोंजालेज आणि रोहन बोपन्ना- मॅट एबडेन ही जोडी आमने सामने आली होती. या सामन्यात बोपन्ना आणि एबडेनची जोडी चमकली.

rohan bopanna
IND vs ENG 1st Test: इंग्लंडला हलक्यात घेऊ नका..' कसोटी मालिकेपूर्वीच दिग्गज खेळाडूची टीम इंडियाला वॉर्निंग

त्यामुळे आंद्रेस मोलटेनी आणि मॅक्सिमो गोंजालेज या जोडीला ६-४,७-६(७-५) ने हा सामना गमवावा लागला आहे. या शानदार विजयासह या जोडीने सेमीफायनलमध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. (Latest sports updates)

या सामन्यापूर्वी झालेल्या सामन्यात रोहन बोपन्ना- मॅट एबडेन या जोडीने नेदरलँडच्या वेस्ली कुलहोफ आणि क्रोएशियाच्या निकोला मेकटीकला सरळ सेटमध्ये पराभूत केलं. त्यांनी या सामन्यात दमदार खेळ करत ७-६,७-६ ने विजय मिळवला.

rohan bopanna
IND vs ENG: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! इंग्लंडविरुद्ध पहिल्या २ कसोटी सामन्यातून विराट कोहली बाहेर

त्यानंतर क्वार्टरफायनलमध्ये रोहन बोपन्ना- मॅट एबडेन या जोडीने आंद्रेस मोलटेनी -मॅक्सिमो गोंजालेज या जोडीवर ६-४,७-६ (७-५) असा विजय मिळवला. दरम्यान रोहन बोपन्ना- मॅट एबडेन या जोडीचं संपूर्ण लक्ष आता सेमीफायनलचा सामना जिंकून अंतिम फेरीत दाखल होण्यावर असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com