मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत सुमीत नागल भारताचं प्रतिनिधित्व करतोय. या स्पर्धेत खेळताना मंगळवारी सुमीतने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याने या स्पर्धेतील पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत प्रवेश केला आहे.
मुख्य फेरीतील पहिल्याच सामन्यात सुमीत आणि अॅलेक्झँडर बब्लिक हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात विजय मिळवत स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. २ तास ३८ मिनिटे चाललेल्या या सामन्यात सुमीतने बब्लिकविरुद्ध खेळताना ६-४,६-२,७-६(७-५) असा विजय मिळवला आहे. (Tennis News In Marathi)
या विजयासह त्याने इतिहास घडवला आहे. कारण १९८९ नंतर कुठल्याही भारतीय खेळाडूला ग्रँडस्लॅम स्पर्धेतील मानांकित खेळाडूविरुद्ध विजय मिळवता आला नव्हता. तो असा कारनामा करणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. ग्रँडस्लॅम स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत पोहचण्याची ही त्याची पहिलीच वेळ नाही. कारण यापूर्वी २०२० मध्ये त्याने अमेरिकन ओपन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला होता. पहिल्या फेरीत त्याने विजय मिळवला होता. मात्र दुसऱ्या फेरीत त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता.
या स्पर्धेपूर्वी २०१९ मध्ये तो अमेरिकन ओपन स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. या सामन्यात त्याला दिग्गज खेळाडू रॉजर फेडररविरुद्ध पराभवाचा सामवा करावा लागला होता. २०१९ आणि २०२० नंतर त्याने २०२१ मध्येही त्याने ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य फेरीत प्रवेश केला होता. मात्र या स्पर्धेतील पहिल्याच फेरीत त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.