Rafael Nadal
Rafael Nadal Saam Tv
क्रीडा | IPL

Australian Open : ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत पाेहचताच Rafael Nadal झाला भावुक

साम न्यूज नेटवर्क

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन 2022 टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या एकेरीत उपांत्य फेरीच्या सामन्यात राफेल नदालने (rafael nadal) इटालियन सातव्या मानांकित मॅटिओ बेरेटिनीचा (matteo berrettini) पराभव केला. नदालला आता २१ व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदासाठी केवळ एक सामना खेळायचा आहे. ऑस्ट्रेलियन ओपनच्या (australian open) अंतिम फेरीत नदालचा (rafael nadal) सामना डॅनिल मेदवेदेव आणि स्टेफानोस सित्सिपास यांच्यातील विजेत्याशी होईल.

रविवारच्या फायनलमध्ये नदालचा विजयी झाल्यास ताे नोव्हाक जोकोविच (Novak Djokovic) आणि रॉजर फेडरर (Roger Federer) यांच्याबराेबर असलेला टाय (three-way tie) ताेडेल आणि नदाल सर्वाधिक ग्रँड स्लॅम एकेरी विजेतेपदांच्या विक्रमाची (record for most Grand Slam singles titles) नाेंद करेल..

नदालने आज रॉड लेव्हर एरिनात वेगवान सुरुवात केली आणि पहिल्या दोन सेटमध्ये विम्बल्डनच्या अंतिम फेरीतील बेरेटिनीची (matteo berrettini) सर्व्हिस लवकर मोडून नियंत्रण मिळवले. बेरेटिनी अखेरीस तिसर्‍या सेटमध्ये उत्तम खेळला आणि त्याने नदालला त्याच्या फोरहँड्सने बळजबरी करण्यास सुरुवात केली, चौथ्या सेटमध्ये सर्व्हिसचा ब्रेक लागला.

दोन तास आणि ५५ मिनिटे चाललेल्या या सामन्यात नदालने मॅटेओ बेरेटिनीचा 6-3, 6-2, 3-6, 6-3 असा पराभव केला. आजच्या विजयानंतर नदाल म्हणाला, “मी सामन्याची सुरुवात छान केली. पहिले दोन सेट सर्वोत्तम होते. मला माहित हाेते की मॅटेओ खूप मजबूत आणि उत्तम खेळाडू आहे. माझ्यासाठी ताे धोकादायक आहे. परंतु मी अखेर पर्यंत लढलाे, झगडलाे कारण या स्पर्धेतील अंतिम फेरीत जाणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे हाेते.

माझ्यासाठी ऑस्ट्रेलियन ओपन सर्वस्व आहे. मी अंतिम सामन्यात उत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल असेही नदालने नमूद केले. मला दुखापतीपासून काही काळ टेनिसपासून दूर रहावे लागले. परंतु मला अपेक्षित नव्हते की पुन्हा मला खेळण्याची संधी मिळेल. मी लढेन.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी गावठी उपाय; आठवडाभरात व्हाल स्लिम-ड्रिम

Today's Marathi News Live : PM नरेंद्र मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर १५ मे रोजी पिंपळगाव बसवंत- जोपुळे रस्ता असणार बंद

Mumbai Local News : कल्याणच्या पुढे १५ डब्याची लोकल सेवा कधी धावणार? रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली मोठी अपडेट

PM Modi Gets Emotional: आईच्या निधनानंतर...,गंगा नदीकाठावर पूजेनंतर PM मोदींच्या डोळ्यांत पाणी!

Special Report : Kal Maharashtra | वकील बाजी मारणार की प्रध्यापक भाकरी फिरवणार? असं आहे उत्तर मध्य मुंबई मतदासंघाचं गणित

SCROLL FOR NEXT