12 mla suspension cancelled: 'त्या' १२ आमदारांचा निर्णय सरकारचा नव्हे तर विधिमंडळाचा : नवाब मलिक

आज सर्वाेच्च न्यायालयात लागलेल्या निकालानंतर राज्यातील विविध नेते या निकालावर प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात निकालावरुन कलगीतूरा रंगला आहे.
mla nawab malik
mla nawab malikSaam Tv
Published On

मुंबई : महाराष्ट्र भाजपच्या १२ आमदारांच्या (MLAs) निलंबनाविषयी सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) मोठा निर्णय दिला आहे. वर्षभराकरिता निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या (BJP) सर्व १२ आमदारांचे निलंबन (12 mla suspension cancelled) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) रद्द केले आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते व राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (ncp leader nawab malik) यांनी सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाचा विधिमंडळ (Maharashtra assembly) सचिवालय अभ्यास करेल आणि त्यानंतर अंतिम निर्णय विधानसभा अध्यक्ष घेती असे स्पष्ट केले आहे.

mla nawab malik
Balu Dhonarkar: बायकाे घरी 'हिटलर'च असते; जिसको बिवी है उसे पता है! जिसे नही, उसका ठिक है!

मलिक (nawab mailk) म्हणाले १२ आमदारांच्या निलंबनाच्या (suspension) बाबतीत सुप्रीम कोर्टाचा (supreme court) निकाल आज आलेला आहे. त्या निकालाची प्रत विधिमंडळ सचिवालयाला प्राप्त झाल्यानंतर सचिवालय त्यावर अभ्यास करेल आणि त्यानंतर अंतिम निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील.

हा सरकारचा निर्णय नसून विधिमंडळाचा निर्णय आहे. विधिमंडळाचे अधिकार आणि न्यायालयाचा आदेश याबाबतीत निश्चितरुपाने जो अभ्यास करायचा असेल तो विधिमंडळ सचिवालय करेल आणि अध्यक्ष महोदय अंतिम निर्णय घेतील असे मलिक यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com