Pat Cummins On Glenn Maxwell saam tv news
Sports

Glenn Maxwell: मैदानात वेदनेने विव्हळत असताना ग्लेन मॅक्सवेल मैदान सोडणार होता? पुढे काय चर्चा झाली; कमिन्सने केला खुलासा

Pat Cummins On Glenn Maxwell: या सामन्यानंतर पॅट कमिन्सने मोठा खुलासा केला आहे.

Ankush Dhavre

Pat Cummins On Glenn Maxwell:

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ग्लेन मॅक्सवेलचा वन मॅन शो पाहायला मिळाला. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने नाबाद २०१ धावांची विक्रमी खेळी करुन संघाला विजय मिळवून दिला.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजय मिळवण्यासाठी २९२ धावांची गरज होती.या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ३ गडी राखून विजय मिळवला. दरम्यान या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने ग्लेन मॅक्सवेलचं कौतुक करत मोठं वक्तव्य केलं आहे.

सामना झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना तो म्हणाला की,'मी पूर्ण खेळी पाहिली. ही आतापर्यंतची सर्वात मोठी खेळी आहे. आपण या खेळीबद्दल केवळ बोलतोय. मी हे नक्कीच बोलू शकतो की, मी त्यावेळी स्टेडियममध्ये हजर होतो ज्यावेळी ग्लेन मॅक्सवेलने एकट्याच्या जीवावर धावांचा पाठलाग केला होता.

तसेच तो पुढे म्हणाला की, मला विश्वास आहे की, फिट होईल. तुम्ही पाहिलं असेलच की त्याला ऑस्ट्रेलियासाठी खेळायला किती आवडतं आणि संघासाठी खेळण्यासाठी तो काहीही करु शकतो.त्यामुळे मला वाटतं की तो पुढील सामन्यापूर्वी फिट होईल.' (Latest sports updates)

कमिन्सने हे देखील सांगितलं की, मॅक्सवेल क्रॅम्पमुळे वेदनेने कळवळत होता. जमीनीवर पडल्यानंतर त्याने पुढील फलंदाज अॅडम झाम्पाला मैदानावर बोलवण्याचा इशारा केला होता. मात्र वेदना होत असतानाही त्याला फलंदाजी करायची होती. त्याने याबाबत फिजियोसोबत चर्चा देखील केली.

या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ५ गडी बाद २९१ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना अवघ्या ९१ धावांवर ऑस्ट्रेलियाने ७ फलंदाज माघारी परतले होते. त्यानंतर पॅट कमिन्स आणि ग्लेन मॅक्सवेलने मिळून २०२ धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. मॅक्सवेलने या डावात नाबाद २०१ धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT