IND VS AUS
IND VS AUS Saam Tv
क्रीडा | IPL

IND Vs AUS 3rd Test: तिसऱ्या टेस्टपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! कर्णधार पॅट कमिन्स बाहेर तर 'या' खेळाडूच्या हाती कर्णधारपदाची धुरा

Ankush Dhavre

IND Vs AUS News: सध्या भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या २ सामन्यांमध्ये भारतीय संघाने जोरदार कामगिरी करत २-० ची आघाडी घेतली आहे. तर मालिकेतील तिसरा सामना येत्या १ मार्चपासून इंदोरच्या होळकर स्टेडियमवर पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रलियाने नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. (Latest Sports Updates)

ऑस्ट्रेलिया संघाला या मालिकेत हवी तशी कामगिरी करता आली नाहीये. पहिल्या २ सामन्यात संघातील फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरले आहेत. तर दुसरा कसोटी सामना झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे काही खेळाडू मायदेशी परतले आहेत.

त्यामध्ये कर्णधार पॅट कमिन्सचा(Pat Cummins) देखील समावेश आहे. तो तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी देखील उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी स्टीव्ह स्मिथकडे देण्यात आली आहे.

दुसरा कसोटी सामना झाल्यानंतर पॅट कमिन्सने वैयक्तिक कारणास्तव माघारी परतण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याला भारतात परतण्यास आणखी काही दिवस लागू शकतात. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी स्टीव्ह स्मिथची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.

कमिन्सच्या अनुपस्थितीत यापूर्वी देखील २ वेळेस स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रलिया संघाची धुरा सांभाळली आहे. कसोटी मालिका झाल्यानंतर दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकेला प्रारंभ होणार आहे. पॅट कमिन्स हा वनडे संघाचा देखील कर्णधार आहे. त्यामुळे तो ही मालिका सुरु होण्यापूर्वी परतणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Tree : आंध्रप्रदेशमधलं निसर्गाचं अद्भुत सौंदर्य; चक्क झाडांच्या खोडातून मिळतं पिण्याचं पाणी

Uddhav Thackeray On Narendra Modi | गाईपेक्षा महागाईवर बोला, ठाकरे बरसले

Sunil Tatkare: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ महायुतीत नाराज? सुनिल तटकरेंनी केला महत्वाचा खुलासा; म्हणाले...

Char Dham Yatra: चारधाम यात्रेदरम्यान रील बनवण्यावर बंदी, व्हीआयपी दर्शनही बंद; सरकारकडून नवा आदेश जारी

Today's Marathi News Live : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना, तपास गुन्हे शाखेकडे

SCROLL FOR NEXT