australian team Icc women world cup champions.  saam tv
क्रीडा

World Cup: महिला विश्वकरंडकावर ऑस्ट्रेलियाची माेहर; गतविजेत्या इंग्लंडचा पराभव

ऑस्ट्रेलियाचा हिलीला सामनावीर आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले.

साम न्यूज नेटवर्क

क्राइस्टचर्च : ऑस्ट्रेलियाच्या (australia) अलायसा हिलीने (Alyssa Healy) केलेल्या दमदार खेळीमुळं महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील (icc women world cup 2022) अंतिम सामन्यात गतविजेत्या इंग्लंडचा (England) ७१ धावांनी पराभव करुन ऑस्ट्रेलिया संघाने विश्वकरंडावर (world cup) माेहर उमटवली. (icc women world cup latest marathi news)

ऑस्ट्रेलिया संघाने पाच गड्यांच्या माेबदल्यात ३५६ धावा केल्या हाेत्या. प्रत्युत्तरास गतविजेत्या इंग्लंडने विक्रमी धावसंख्या गाठण्यासाठी धावगती कायम ठेवली परंतु ४४ व्या षटकात २८५ धावांवर त्यांचा डाव संपुष्टात आला. नताली स्कायव्हरने (Natalie Sciver) नाबाद १४८ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाचा हिलीला सामनावीर आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. दरम्यान ऑस्ट्रेलियाने १२ विश्वकरंडक स्पर्धेतील सातव्या विजेतेपदासह (cricket) ५० षटकांच्या फॉरमॅटवर वर्चस्व राखले. गेल्या चार वर्षांत ३९ सामन्यांमधून ३८ विजय मिळवून त्यांचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय विक्रम वाढवला.

Edited By : Siddharth Latkar

australian team celebrating after winning Icc women world cup championship.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माहिममधून अमित ठाकरे आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT