scott boland twitter
Sports

IND vs AUS: टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर! या खेळाडूकडे नेतृत्वाची धुरा

Australia A Squad: भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या ४ दिवसीय सामन्यांसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा करण्यात आली आहे.

Ankush Dhavre

Australia A Squad For AUS A vs IND A Series: भारतीय संघासाठी येणारे काही दिवस अतिशय महत्वाचे असणार आहे. नोव्हेंबर महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया ए आणि भारत ए या दोन्ही संघांमध्ये २ चार दिवसीय सामने होणार आहेत.

या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया ए संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात १७ खेळाडंचा समावेश करण्यात आला आहे. तर ब्यू वेबस्टरकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

कोणाला मिळालं स्थान?

शेफील्ड शिल्ड स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या सॅम कोन्टासला या संघात स्थान देण्यात आलं आहे. त्याने या स्पर्धेत खेळताना दक्षिण ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ शतकं झळकावली होती. यासह कॅमरुन बेनक्राफ्ट आणि मार्कस हॅरीस यांचा देखील या संघात समावेश करण्यात आला आहे. मार्कसने तस्मानियाविरुद्ध फलंदाजी करताना १४३ धावांची शानदार खेळी केली होती.

या वेगवान गोलंदाजांना मिळाली संधी

या संघात टॉड मर्फी आणि कोरी रोचिसिओली यांना देखील स्थान देण्यात आलं आहे. या दोन्ही खेळाडूंनी जर भारतीय ए संघाविरुद्ध चांगली कामगिरी केली, तर या खेळाडूंचा ऑस्ट्रेलियाच्या मुख्या संघात समावेश केला जाऊ शकतो. या मालिकेसाठी ६ वेगवान गोलंदाजांना संघात स्थान देण्यात आलं आहे.

केव्हा कोणार मालिका?

पहिला सामना - ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर

दुसरा सामना - ७ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर

या मालिकेसाठी असा आहे ऑस्ट्रेलिया ए संघ:

नाथन मॅकस्वीनी (कर्णधार), कॅमरून बेनक्रॉफ्ट, स्कॉट बोलँड, जॉर्डन बकींघम, कूपर कोनोली, ओली डेविस, मार्कस हॅरिस, सॅम कोनस्टास, नाथन मॅकएंड्रयू, माइकल नेसर, टॉड मर्फी, फर्गस ओ'नील, जिमी पीरसन, जोश फिलिप , कोरी रोचिसिओली, मार्क स्टेकेटी, ब्यू वेबस्टर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मतदानाच्या आदल्या दिवशीच शिंदे सेनेच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक; तोडफोडही केली, भाजपवर आरोप

Viral Video: चालत्या बाईकवर मारहाण! पत्नीने 27 सेकंदात पतीला १४ वेळा लगावल्या कानाखाली

Municipal Election : मतदानाआधी जिथं-तिथं पैशांचा पाऊस, VIDEO

Maharashtra Live News Update: मकर संक्रांति निमित्त औंढा नागनाथ मंदिरात महिलांनी वान दिले

महापालिका मतदानापूर्वीच खळबळ; शेकडो मतदान कार्डांचा ढीग आढळला, निवडणूक अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT