shamar joseph
shamar joseph saam tv news
क्रीडा | IPL

AUS vs WI: पदार्पणाच्या सामन्यातच वेस्टइंडिजच्या गोलंदाजाची कमाल! ८५ वर्षांत पहिल्यांदाच झाला हा रेकॉर्ड

Ankush Dhavre

Shamar Joseph News:

वेस्टइंडीज आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेचा थरार सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात शमर जोसेफने वेस्टइंडीज संघाकडून पदार्पण केलं आहे. दरम्यान आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर त्याने ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथला बाद करत माघारी धाडलं आहे. यासह त्याने ८५ वर्षांपूर्वीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. (Shamar Joseph Record)

यापूर्वी १९३९ मध्ये वेस्टइंडीजच्या ट्रेलेर जॉन्सनने कसोटी पदार्पणाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवली होती. हा कारनामा त्यांनी इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात करून दाखवला होता. आता याच संघातील खेळाडू शमर जोसेफने ट्रेलेर जॉन्सनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. यासह शमर जोसेफ हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवणारा २३ वा गोलंदाज ठरला आहे. शमरपूर्वी २२ गोलंदाजांनी हा कारनामा करून दाखवला आहे. (Latest sports updates)

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, वेस्टइंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेला हा सामना ॲडीलेडच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्टइंडीज संघाचा डाव अवघ्या १८८ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत २ गडी बाद ५९ धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाकडून अजूनही उस्मान ख्वाजा आणि कॅमरून ग्रीन मैदानावर टिकून आहेत. वेस्टइंडीज दोन्ही विकेट्स शमर जोसेफने घेतल्या आहेत. दरम्यान संघातील अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ बाद होऊन माघारी परतला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Politics: निवडणुकीपूर्वी दिल्लीत मोठी घडामोड; राघव चढ्ढा लंडनहून परताच घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, चर्चा गुलदस्त्यात

Dombivli : डोंबिवलीत गावगुंडांचा ट्रक चालकावर प्राणघातक हल्ला, एकास अटक

Mulund BJP | बघतोच आता, उद्धव ठाकरे यांचा पोलिसांना थेट इशारा

Crime News: आयुर्वेदिक डॉक्टरकडून सुरु होता संतापजनक प्रकार! संभाजीनगरमधील खळबळजनक घटना नेमकी काय?

Gallstones News : पित्ताशयातील खडे कसे बरे होतात? वाचा डॉक्टरांनी सांगितलेले समज आणि गैरसमज

SCROLL FOR NEXT