cricket players Twitter
Sports

Aus vs SA 2023 Semi Final: मिलरच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेची २१२ धावांपर्यंत मजल; फायनलमध्ये कोण जाणार?

Aus vs SA 2023 (1st Inning Score) | World cup 2023 Semi Final 2023: सेमीफायनलच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची घसरगुंडी झाल्याचं पाहायला मिळलं.

Bharat Jadhav

Aus vs SA 2023 (1st Inning Score) World Cup Semi Final Update:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सेमीफायनलचा दुसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये होत आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानावर हा सामना सुरू आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियासमोर मोठी धावसंख्या उभी करण्याचा निर्धार दक्षिण आफ्रिकेच्या संघाने केला होता. परंतु आफ्रिकेच्या संघाची सुरुवात खराब झाली. आफ्रिकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाच्या संघासमोर माफक २१३ धावांचं आव्हान दिलं. मिलरने केलेल्या शतकाच्या जोरावर आफ्रिकेच्या संघाने २१२ धावांपर्यंत मजल मारली. (Latest News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आफ्रिकेच्या फलंदाजीची दबावात सुरू झाली होती. अवघ्या ४४ धावांवर दक्षिण आफ्रिकेने ४ गडी गमावले होते. त्यानंतर पाऊस आल्यामुळे काही वेळापर्यंत सामना थांबवण्यात आला होता. पाऊस बंद झाल्यानतंर सामना जेथे थांबला होता, तेथून चालू झाला होता. त्यावेळी डेविड मिलर आणि एनरिक क्लासेन यांनी डाव संभाळला. डेविड मिलरने एकाकी झुंज देत मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला, परंतु आस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीपुढे आफ्रिकेच्या फलंदाजांनी गुघडे टेकले होते. मिलरने ११५ चेंडूंचा सामना करत ८ चौकार आणि ५ षटकारच्या मदतीने शतक केलं.

यामुळे आफ्रिकेच्या संघाला फायनलमध्ये जायचं असेल तर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना छोट्या लक्ष्याचा बचाव करावा लागेल. दरम्यान २१२ धावसंख्या करण्यासाठी क्लासेनने ४७ धावांची खेळी केली. कोइट्झने १९ धावा केल्या. तर मार्कराम आणि रबाडाने प्रत्येकी १० धावांचे योगदान दिलं. तर ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी तीन बळी घेतले. जोश हेझलवूड आणि ट्रॅव्हिस हेडने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

SCROLL FOR NEXT