World Cup 2023: ऑस्ट्रेलिया की दक्षिण आफ्रिका? कोणाला मिळेल फायनलचं तिकीट; पाहा दोन्ही संघाचा हेड टू हेड रेकॉर्ड

AUS vs SA Head To Head Record: आज ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.
aus vs sa
aus vs satwitter

AUS vs SA, World Cup Semi Final:

भारतीय संघ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या फायनलमध्ये दाखल झाला आहे. सेमीफायनलच्या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा ७० धावांनी धुव्वा उडवला. भारतीय संघ आता फायनलचा सामना खेळण्यासाठी अहमदाबादला रवाना होणार आहे.

तर दुसऱ्या सेमीफायनलचा सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानावर रंगणार आहे.

दक्षिण आफ्रिकेला पहिल्यांदा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये जाण्याची संधी असणार आहे.तर दुसरीकडे पाच वेळचा वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा संघ सहावा टायटल जिंकण्यासाठी आगेकुच करताना दिसून येईल.

दोन्ही संघ या स्पर्धेत दमदार फॉर्ममध्ये असल्याचं दिसून आलं आहे. या दोन्ही संघांनी साखळी फेरीतील ७-७ सामने जिंकले आहेत. या महत्वाच्या सामन्यापूर्वी जाणून घ्या कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड.

aus vs sa
Ind vs NZ: Virat Kohli याने विक्रम मोडल्यानंतर Sachin Tendulkar ची पहिली प्रतिक्रिया समोर!

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ १०९ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान दक्षिण आफ्रिकेचा संघ वरचढ असल्याचं दिसून आलं आहे. दक्षिण आफ्रिकेने ५५ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे.

तर ऑस्ट्रेलियाला ५० सामने जिंकता आले आहेत. गेल्या ४ सामन्यांचा रेकॉर्ड पाहिला तर दक्षिण आफ्रिकेने चारही सामने जिंकले आहेत. या स्पर्धेतील साखळी फेरीतील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर १३४ धावांनी विजय मिळवला होता. (Latest sports updates)

aus vs sa
IND vs NZ, Semi Final 2023: गिलचा गगनचुंबी षटकार,बॉल थेट ड्रेसिंग रुममध्ये!रोहितची भन्नाट रिॲक्शन Viral;Video

कोणाला मिळेल फायनलचं तिकीट?

हे दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघ तुफान फॉर्ममध्ये देखील आहेत. ऑस्ट्रेलियाचा वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये दमदार रेकॉर्ड राहिला आहे. तर संपूर्ण स्पर्धेत चांगला खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये जाऊन पराभूत होतो.

यापू्र्वी दक्षिण आफ्रिकेचा संघ एकदाही वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश करु शकलेला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ वर्ल्डकप फायनलमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com