australia-test-team saam tv news
क्रीडा

AUS vs PAK: PAK विरुद्धच्या पहिल्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा! आक्रमक खेळाडूला मिळालं स्थान; पाहा संपूर्ण संघ

AUS vs PAK 1st Test: पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे

Ankush Dhavre

Australia vs Pakistan 1st Test:

पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना १४ डिसेंबर रोजी पर्थच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघाची घोषणा केली आहे.

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १४ डिसेंबर ते १८ डिसेंबर दरम्यान खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी निवडण्यात आलेल्या संघात फलंदाजीवर भर देण्यात आल्याचं दिसून आलं आहे.

ज्यात ट्रेविस हेड, मार्नस लाबुशेन, उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरसारख्या फलंदाजांचा समावेश आहे. तर अष्टपैलू खेळाडू म्हणून मिचेल मार्श आणि कॅमेरुन ग्रीन यांचा समावेश करण्यात आला आहे. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून अॅलेक्स कॅरीला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते. (Latast sports updates)

या गोलंदाजांना मिळालं स्थान..

पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात ६ गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यात कर्णधार पॅट कमिन्ससह,जोश हेजलवूड, स्कॉट बोलँड, नॅथन लायन, मिचेल स्टार्क, लांस मॉरीस यांचा समावेश आहे.

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेनंतर पाकिस्तानच्या संघातही बदल करण्यात आले आहेत. बाबर आझमला कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आलं आहे. मात्र पहिल्या कसोटीत तो पाकिस्तानच्या प्लेइंग ११ मध्ये खेळताना दिसून येऊ शकतो.

पहिल्या कसोटीसाठी असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ:

पॅट कमिंस (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमरून ग्रीन, जोश हेज़लवुड, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, लांस मॉरिस, स्टीव्ह स्मिथ, मिच स्टार्क, डेव्हिड वॉर्नर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घरबसल्या अनुभवा ॲक्शनचा धमाका; 'Kanguva' आता ओटीटीवर, कधी अन् कुठे पाहाल

Wedding Rituals Varmala Cermony: लग्नात वर-वधूला वरमाला का घालतात? नेमकं कारण काय, जाणून घ्या...

हे आहेत डोके आणि मानेचे प्रमुख कर्करोग, प्रतिबंधासाठी जीवनशैलीत करा हे बदल...

IND vs AUS: टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण, विराट गेला होता हॉस्पिटलमध्ये, सरावावेळी २ फलंदाज जायबंदी

Hydrogen Railway: देशात लवकरच येणार हायड्रोजनवर चालणारी रेल्वे; वैशिष्ट्ये काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT