Ind vs NZ 2nd Test saam tv
Sports

Ind vs NZ 2nd Test: पहिल्या दिवसअखेर न्यूझीलंडच्या ५ विकेट्स, ब्लंडेल- फिलिप्सने डाव सावरला, आकाश दीपची भेदक गोलंदाजी!

IND vs NZ 2nd Test: भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडने ५ विकेट गमावून २४६ धावा केल्या. टॉम ब्लंडेल आणि ग्लेन फिलिप्स नाबाद आहेत. आकाश दीपने दोन विकेट घेतल्या. गुरनूर बरारने पदार्पणात पहिली विकेट मिळवून दिली.

Surabhi Jayashree Jagdish

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा सामना क्राइस्टचर्चच्या हेगले ओव्हल मैदानावर खेळवला जातोय. या सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने पहिल्या डावात ५ विकेट गमावून २४६ रन्स केले आहेत. टॉम ब्लंडेल ५३ रन्सवर, तर ग्लेन फिलिप्स ३६ रन्सवर नाबाद आहेत. भारताकडून आकाश दीपने सर्वाधिक २ विकेट घेतल्या आहेत.

या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियामध्ये मोहम्मद सिराजला पुन्हा एकदा संधी मिळालेली नाही. प्रसिद्ध कृष्णाच्या जागी गुरनूर बरारला टीममध्ये स्थान देण्यात आलंय. गुरनूरचा हा पहिलाच टेस्ट सामना आहे.

न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पहिल्या डावात कशी कामगिरी केली?

न्यूझीलंडच्या ओपनर्सने पहिल्या डावात टीमला चांगली सुरुवात करून दिली. कर्णधार टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉन्वे यांनी पहिल्या विकेटसाठी ७७ रन्सची पार्टनरशिप केली. पण पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या गुरनूर बरारने कॉन्वेला बाद करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. कॉन्वेने ३१ रन्स केले. पहिल्या दिवसाच्या लंच ब्रेकपूर्वी टाकलेल्या शेवटच्या चेंडूवर त्याची विकेट पडली.

लंचनंतर टॉम लॅथमने आपले अर्धशतक पूर्ण केलं. त्याने १२८ चेंडूंचा सामना करत ६ चौकारांच्या मदतीने ५९ रन्स केले. आकाश दीपने त्याला बाद करत भारताला दुसरी विकेट मिळवून दिली. त्यानंतर अंशुल कंबोजने हेन्री निकोल्सला १६ रन्सवर बाद केलं. यामुळे न्यूझीलंडला तिसरा धक्का बसला. यानंतर आकाश दीपने रचिन रवींद्रला शून्यावर बाद केलं. त्यामुळे न्यूझीलंडची चौथी विकेट पडली.

यानंतर टॉम ब्लंडेल आणि डॅरिल मिचेल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी ७४ रन्स केले. पण वॉशिंग्टन सुंदरने मिचेलला ३१ रन्सवर बाद केलं. ध्रुव जुरेलने त्याचा कॅच पकडला आणि ही पार्टनरशिप संपुष्टात आली.

मिचेल बाद झाल्यानंतर ग्लेन फिलिप्सने टॉम ब्लंडेलला साथ दिली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद ६२ रन्सची पार्टनरशिप केली. दिवसाचा खेळ संपेपर्यंत या दोघांनी आणखी विकेट पडू दिली नाही. त्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने ५ विकेट गमावून २४६ रन्स केले होते.

भारताविरुद्ध न्यूझीलंडचा अलीकडचा रेकॉर्ड कसा आहे?

भारताविरुद्ध न्यूझीलंडची अलीकडची कामगिरी चांगली राहिली आहे. दोन्ही टीम्समध्ये झालेल्या मागील ९ टेस्ट सामन्यांपैकी ६ सामन्यांमध्ये न्यूझीलंडने विजय मिळवला आहे. क्राइस्टचर्चच्या हेगले ओव्हल मैदानावरील टेस्ट सामन्यांमध्ये डावानुसार रन्सची सरासरी पाहिली तर पहिल्या डावात २९१, दुसऱ्या डावात ३४३, तिसऱ्या डावात २७२ आणि चौथ्या डावात २४८ रन्स केलेत.

भारतीय टीमने या मैदानावर आतापर्यंत केवळ एक टेस्ट सामना खेळलाय. २०२० मध्ये झालेल्या या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टेस्ट सामन्यांचा रेकॉर्ड

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत टेस्ट क्रिकेटमध्ये एकूण ६६ सामने खेळले गेलेत. यापैकी भारतीय टीमने २२ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडने १६ सामने जिंकलेत. दोन्ही टीममधील २८ सामने अनिर्णित राहिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budget 2027: पगार ४२ हजार अन् ग्रॅच्युइटी ४० लाख! बजेट २०२७ मध्ये कर्मचाऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट?

Kalyan : मुंबईत धावत्या लोकलमध्ये थरार, प्रवाशावर धारदार शस्त्राने हल्ला; धक्कादायक कारण समोर

Congress: मोठी बातमी! महाराष्ट्र काँग्रेसचा मोठा निर्णय, सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या स्थगित

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीकडून निषेध आंदोलन

Dustbin Vastu Tips: घरात कचऱ्याचा डबा कोणत्या दिशेला ठेवावा? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा

SCROLL FOR NEXT