Asian Games 2023 Women's Hockey twitter
Sports

Asian Games 2023 Hockey: हॉकीत गोल्डचं स्वप्न हुकलं! महिला संघाचा चीनकडून ४-० ने पराभव

Asian Games 2023 Women's Hockey: भारतीय महिला संघाला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Ankush Dhavre

Asian Games 2023 Women's Hockey:

आशियाई क्रीडा २०२३ स्पर्धेत भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करत आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

तर दुसरीकडे महिला हॉकी संघाच्या पदरी निराशा पडली आहे. सेमीफायनलच्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाला चीनकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह दुसऱ्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्न हुकलं आहे.

भारतीय संघाला सेमीफायनलच्या सामन्यात चीनकडून ४-० ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवाने सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्न तर हुकलं आहे. आता कांस्यपदक जिंकण्यासाठी महिला हॉकी संघ मैदानावर उतरणार आहे .

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, जियाकी झोंगने चीनसाठी पहिला गोल केला. त्यानंतर झोऊ मेइरोंगने यजमान चीन संघासाठी दुसरा गोल केला.

या सामन्यात लियांग मेइयूने चीनसाठी तिसरा गोल केला. तर गू बिंगफेंगने चौथा गोल करत चीनला भारतीय संघावर ४-० ची आघाडी मिळवून दिली.

भारतीय संघाचा कांस्यपदकाचा सामना शनिवारी होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ जपान किंवा दक्षिण कोरीयाचा सामना करताना दिसून येऊ शकतो. (Latest sports updates)

असा राहिलाय भारतीय संघाचा प्रवास..

भारतीय संघाने साखळी फेरीतील सामन्यात दमदार खेळ केला होता. सिंगापूरविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघाने १३-० ने विजय मिळवला होता. त्यानंतर मलेशियाविरूद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ६-० ने विजय मिळवला होता. दक्षिण कोरियाविरूद्ध झालेला सामना १-१ च्या बरोबरीत समाप्त झाला होता. त्यानंतर हाँगकाँगला १३-० ने धुळ चारली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Detox: लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय, आरोग्य सुधारेल

Gulgule Recipe: नाश्त्याला काय करायचं सूचत नाही? ही गोड गुलगुल्यांची झटपट रेसिपी ट्राय करा

प्रेमाला विरोध, प्रेमी युगुलाचा टोकाचा निर्णय; गळफास घेत दोघांनी आयुष्य संपवलं

Tea Addiction: दुधाचा चहा पिताय? सावधान! शरीरावर होईल गंभीर परिणाम

Maharashtra Live News Update : सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर 192 कोटी जमा

SCROLL FOR NEXT