Asian Games 2023: नीरजचा सुवर्ण पदकावर निशाणा, भालाफेकमध्ये भारताच्या खात्यात दोन पदके

Asian Games 2023: भारताचा स्टार खेळाडू नीरज चोपडाने पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्द पदक जिंकलं आहे.
Asian Games 2023:
Asian Games 2023: Twitter
Published On

Asian Games 2023:

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची पदकांची कमाई सुरुच आहे. भारताचा स्टार खेळाडू नीरज चोपडाने पुरुषांच्या भालाफेकमध्ये सुवर्द पदक जिंकलं आहे. तर भारताच्या किशोर जेना याने भालाफेकमध्ये रौप्यपदक जिंकलं आहे. या दोघांच्या कामगिरीमुळे आज भारताच्या खात्यात दोन पथकांची भर पडली आहे. (Latest Marathi News)

भारताकडून भालाफेकमध्ये नीरज चोपडा याने दुसऱ्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेत दुसऱ्यांदा सुवर्ण पदक जिंकलं आहे. नीरजने ८८.८८ मीटर लांब भाला फेकून सुवर्ण पदक मिळवलं आहे. तर किशोर जेनाने ८७.५४ मीटर लांब भाला फेकून रौप्यपदक जिंकलं आहे. किशोरने पहिल्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला होता.

नीरजने २०१८ जकार्तामध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकलं होतं. तर किशोर जेना याने आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिलं पदक जिंकलं आहे. तर आशियाई क्रीडा स्पर्धेत गेंकी डीन याने ८२. ६८ मीटर लांब भाला फेकून तिसरं स्थान मिळवलं.

भारताने भालाफेकमध्ये रचला इतिहास

१९५१ सालापासून आशियाई क्रीडा स्पर्धा होत आहे. ७२ वर्षांच्या इतिहासात भालाफेकमध्ये भारताने एकाचवेळी सुवर्ण आणि रौप्य पदक अशी दोन पदके जिंकली आहे. भारताकडे आता भालाफेकमध्ये एकूण पाच पदके झाली आहेत.

१९५१ साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत परसा सिंह यांनी रौप्य पदक जिंकलं आहे. तर १९८२ साली गुरतेज सिंह यांनी कांस्यपदक जिंकलं. तर २०१८ साली नीरजने सुवर्ण पदक जिंकलं. त्यानंतर आज भारताने भालाफेकमध्ये दोन पदके जिंकली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com