Asian games 2023 sepak takraw is the mixture of gymnast football volleyball and badminton know how this game started Twitter
क्रीडा

Asian Games 2023: ना फुटबॉल, ना व्हॉलीबॉल! सेपक टकराव हा खेळ खेळतात तरी कसा? जाणून घ्या A to Z माहिती

Sepak Takraw: जाणून घ्या स्पर्धेची सुरुवात कशी झाली अन् हा खेळ कसा खेळला जातो.

Ankush Dhavre

Sepak Takraw:

आशियाई क्रीडा स्पर्धेत रविवारी (१ ऑक्टोबर) भारतीय संघ सेपक टकराव खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. हा खेळात तुम्हाला फुटबॉल , बॅडमिंटन, जिमनेस्ट आणि व्हॉलिबॉलचं मिक्स व्हर्जन पाहायला मिळेल. जाणून घ्या स्पर्धेची सुरुवात कशी झाली अन् हा खेळ कसा खेळला जातो.

कशी झाली सुरुवात?

हा खेळ चीनी बॉल गेम कुजूचं दुसरं व्हर्जन असल्याचं म्हटलं जातं. १९९० मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत या खेळाचा समावेश करण्यात आला होता. पहिल्यांदा बीजिंगमध्ये हा खेळ खेळला गेला होता.

तर १९९८ मध्ये पहिल्यांदाच महिलांना हा खेळ खेळण्याची अनुमती दिली गेली होती. याच वर्षी बँकॉकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांचा संघ सेपक टकराव खेळण्यासाठी मैदानात उतरला होता.

कसा खेळला जातो हा खेळ?

तुम्ही आतापर्यंत व्हॉलीबॉल, फुटबॉल आणि बॅडमिंटन हे खेळताना पाहिले असतील. सेपक टकराव हा खेळ या तिन्ही खेळांचं मिक्स व्हर्जन आहे.

या खेळात व्हॉलीबॉल प्रमाणेच मध्ये नेट असते. मात्र बॉल हाताने मारता येत नाही. तुम्हाला पायांचा वापर करून बॉल नेटच्या पलीकडे मारावा लागतो. पॉइंट्स देण्याची पद्धत ही व्हॉलीबॉल सारखीच असते. (Latest sports updates)

सेपक टकरावचा अर्थ काय?

सेपक टकराव हा मलेशिया आणि इंडोनेशियातून घेण्यात आलेला शब्द आहे. सेपक म्हणजे किक मारणं. तर टकराव म्हणजे शिवलेला बॉल. असा सेपक टकराव या शब्दाचा अर्थ आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT