asian games 2023 day 8 live golfer aditi ashok won gold in womens golf sports news in marathi Twitter
Sports

Asian Games 2023: गोल्फमध्ये आदितीची रौप्यक्रांती! गोल्डमेडल हुकलं मात्र सिल्व्हर मेडल जिंकत घडवला इतिहास

Asian Games 2023 Day 8 Live: आदिती अशोकने गोल्फमध्ये पदक जिंकून इतिहास घडवला आहे.

Ankush Dhavre

Asian Games 2023 Day 8 Live, Aditi Ashok Won Silver Medal In Golf:

चीन मध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ केल्याचं पाहायला मिळाले आहे. स्पर्धेतील आठव्या दिवशीही भारताने पदक जिंकून सुरुवात केली आहे. आठव्या दिवसाच्या सुरुवातीलाच आदिती अशोकने गोल्फमध्ये भारताला रौप्यपदक जिंकून दिलं आहे. यासह तिने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे.

आदिती अशोक ही गोल्फमध्ये पदक जिंकणारी पहिलीच भारतीय महिला गोल्फर ठरली आहे. तिला या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती. त्यादिशेने तिची वाटचाल सुरू होती. तिच्याकडे सात स्ट्रोकची आघाडी होती. मात्र शेवटच्या क्षणी ती दोन स्ट्रोक राहून गेली. त्यामुळे तिचं सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्नं हुकलं. थायलंडच्या अपिरचाया युबोलने सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे.

आदिती अशोक ही भारताकडून सर्वात यशस्वी महिला गोल्फपटू ठरत आहे. लहनपणापासूनच तिला गोल्फर व्हायचं होतं. वयाच्या १३ व्या वर्षी राज्य स्तरावर गोल्फमध्ये ट्रॉफी जिंकायला सुरुवात केली. टोकियो ओलंपिक स्पर्धेत देखील तिने दमदार खेळ केला होता. मात्र तिचं पदक जिंकण्याचं स्वप्नं हुकलं होतं. (Latest sports updates)

आदिती अशोकच्या या पदकासह भारताची पदकांची संख्या ४० च्या पुढे गेली आहे. सातव्या दिवशी भारताची पदकांची संख्या ३८ इतकी होती. आठव्या दिवशी आदितीने रौप्य तर राजेश्वरी कुमारी, प्रीती रजक आणि मनीषाने ट्रॅप टीम इव्हेंटमध्ये भारताला कांस्यपदक जिंकून दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकच्या निफाड तालुक्यातील गावांना पावसाचा फटका

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT