Asian Games 2023 Saam TV
Sports

Asian Games 2023 : भारतीय नेमबाजांचा 'सुवर्ण'वेध; २५ मीटर पिस्तूल स्पर्धेत महिला संघाला सुवर्णपदक

Asian Games 2023 Day 4 Live: मनू भाकर, ईशा सिंग आणि रिदम संगवान यांनी २५ मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.

प्रविण वाकचौरे

Asian Games 2023 Day 4 Live:

भारतीय नेमबाजी संघाने चौथ्या दिवशी पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली आहे. भारताने सुवर्णपदकावर कब्जा केला आहे. मनू भाकर, ईशा सिंग आणि रिदम संगवान यांनी २५ मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. त्यांनी चीनला तीन अकांनी हरवले.

मनू भाकर, ईशा सिंग, रिदम संगवान या महिला नेमबाजांनी 25 मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत एकूण 1759 गुण मिळवले. या कामगिरीसह त्यांनी आशियाई खेळांमध्ये भारताचे चौथे सुवर्णपदक जिंकले. (Latest sports updates)

त्याआधी आशी चौकसे, मानिनी कौशिक आणि सिफ्ट कौर समरा यांच्या संघाने महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत रौप्यपदक जिंकून भारताचे 15 वे पदक जिंकले.

हँगझोऊ येथे सुरू असलेल्या खेळांमध्ये भारताची पदकांची संख्या 16 गेली आहे. एकूण 16 पदकांसह भारत पदकतालिकेत सहाव्या स्थानावर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : परिस्थितीशी दोन हात करावे लागणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं काही तरी घडणार

Aravallis Hills: अरवली पर्वतरांगांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; खाणकामावर पूर्णपणे बंदी, राज्यांना आदेश

Belly Fat: वयाच्या तिशीनंतरच का वाढतो पोटाचा घेर? जाणून घ्या 'चरबी' वाढण्याची ४ कारणे

Maharashtra Live News Update: चित्रपट दिग्दर्शक सयाजी शिंदेंनी उभा केलेल्या देवराईला अचानक आग

'वंचित' आणि MIM ने निवडणुकीसाठी रणशिंग फुकलं; उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणाला कुठून मिळाली संधी?

SCROLL FOR NEXT