Asian Games 2023: भारतीय घोडेस्वार चीन,जपानवर पडले भारी;४१ वर्षांची प्रतिक्षा संपवत पटकावलं सुवर्णपदक

equestrian news in marathi: भारतीय संघाने ४१ वर्षांनंतर पहिल्यांदाच सुवर्णपदक पटकावलं आहे.
India won gold medal in  Equestrian event in asian games 2023 asian games news in marathi Equestrian news in marathi
India won gold medal in Equestrian event in asian games 2023 asian games news in marathi Equestrian news in marathiSaam tv news
Published On

Team India Won Gold In Equestrian in Asian Games:

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशीही भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरूच आहे. तिसऱ्या दिवशी भारताने घोडेस्वारी इव्हेंटमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. भारताच्या घोडेस्वारी संघाने ४१ वर्षांची प्रतिक्षा संपवत पहिल्यांदाच भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं आहे. भारताकडून दिव्यकिर्ती सिंग, सुदिप्ती हजेला,अमुश अग्रवाल आणि हृदय छेडाने भारताच्या विजयात मोलाचं योगदान दिलं आहे. (Equestrian News In Marathi)

भारतीय घोडेस्वारी संघाने ४० वर्षांची प्रतिक्षा संपवत पहिल्यांदाच सुवर्णपदक पटकावलं आहे. या इव्हेंटच्या अंतिम फेरीत भारतीय संघाने २०९.२०५ गुणांची कमाई केली. भारताकडून दिव्युकिर्ती सिंगने ६८.१७६ ,अनुश अग्रवालने ७१.०८८ आणि हृदय छेडाने ६९.९४१ गुणांची कमाई केली. भारतीय संघाने चीनला ४.५ गुणांनी मागे सोडत सुवर्णपदक पटकावलं आहे. (Latest sports updates)

India won gold medal in  Equestrian event in asian games 2023 asian games news in marathi Equestrian news in marathi
IND vs AUS ODI Series: मालिका जिकूंनही रोहितचं टेन्शन वाढलं! वर्ल्डकपपूर्वी घ्यावा लागणार हा मोठा निर्णय

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी तिसरं सुवर्णपदक..

आशियाई क्रीडा स्पर्धेत हे भारताचं तिसरं सुवर्णपदक आहे. यापूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेला १९ धावांनी पराभूत करत सुवर्णपदक पटकावलं होतं. यापूर्वी झालेल्या शुटींग इव्हेंटमध्ये भारताला सुवर्णपदक मिळालं होतं. भारतीय संघाने आतापर्यंत १४ पदके पटकावली आहेत. ज्यात ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि ४ कांस्यपदकांचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com