Asian Games 2023 : आशियाई स्पर्धेच्या चौथ्या दिवसाची सुरुवात सिल्वर मेडलने, ५० मीटर रायफलमध्ये भारतीय संघाची चमकदार कामगिरी

Asian Games 2023 Day 4 Live: भारताच्या खात्यात आतापर्यंत 15 पदके जमा झाली आहेत.
Asian GAmes
Asian GAmes Saam TV
Published On

Asian Games 2023 Day 4 Live:

आशियाई स्पर्धेची भारताची चौथ्या दिवसाची सुरुवात सिल्वर मेडलने झाली आहे. नेमबाज संघाने उत्तम कामगिरी करत भारताला सिल्वर मेडल जिंकून दिलं आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत १५ पदके जमा झाली आहेत.

सिफ्ट कौर समरा, मानिनी कौशिक आणि आशी चोक्सी यांनी चमकदार कामगिरी केली आहे. भारताने ५० मीटर रायफल प्रकारात हे सिल्वर मेडल पटकावले आहे. मेडल लिस्टमध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे. तर चीनने यामध्ये गोल्ड मेडल जिंकले आहे.

काल भारताच्या घोडेस्वारी संघाने ४१ वर्षांची प्रतिक्षा संपवत पहिल्यांदाच भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं आहे. भारताकडून दिव्यकिर्ती सिंग, सुदिप्ती हजेला,अमुश अग्रवाल आणि हृदय छेडाने भारताच्या विजयात मोलाचं योगदान दिलं आहे.

या इव्हेंटच्या अंतिम फेरीत भारतीय संघाने २०९.२०५ गुणांची कमाई केली. भारताकडून दिव्युकिर्ती सिंगने ६८.१७६ ,अनुश अग्रवालने ७१.०८८ आणि हृदय छेडाने ६९.९४१ गुणांची कमाई केली. भारतीय संघाने चीनला ४.५ गुणांनी मागे सोडत सुवर्णपदक पटकावलं आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी तिसरं सुवर्णपदक

शियाई क्रीडा स्पर्धेत हे भारताचं तिसरं सुवर्णपदक आहे. यापूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेला १९ धावांनी पराभूत करत सुवर्णपदक पटकावलं होतं. यापूर्वी झालेल्या शुटींग इव्हेंटमध्ये भारताला सुवर्णपदक मिळालं होतं. भारतीय संघाने आतापर्यंत १४ पदके पटकावली आहेत. ज्यात ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि ४ कांस्यपदकांचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com