BCCI demands Asia Cup Trophy from ACC President Mohsin Naqvi after delay in handover to Team India. Saamtv
Sports

Asia Cup Trophy Controversy: आशिया कपची ट्रॉफी घेऊन जाणाऱ्या नक्वीवर होणार मोठी कारवाई; बीसीसीआयचा इशारा

Asia Cup Trophy Controversy: बीसीसीआयने एसीसी प्रमुख मोहसिन नक्वी यांना आशिया कप ट्रॉफी तात्काळ भारताला सोपवण्याचा इशारा दिलाय. स्पर्धा जिंकूनही टीम इंडियाला अद्याप ट्रॉफी मिळालेली नाहीये. टॉफीबाबत सकारात्मक उत्तर आले नाही तर बीसीसीआय हा मुद्दा आयसीसीकडे नेण्यात येईल.

Bharat Jadhav

  • भारताने आशिया कप जिंकूनही ट्रॉफी मिळालेली नाहीये.

  • एसीसी अध्यक्ष मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन दुबईत गेले होते.

  • ट्रॉफी न दिल्यास बीसीसीआय आयसीसीकडे मुद्दा उपस्थित करणार आहे.

पाकिस्तानला पराभूत करत टीम इंडियाने आशिया कप स्पर्धेत विजेतेपद मिळवलं. परंतु भारताला आशिया कप अजून मिळाला नाहीये. पीसीबी अध्यक्ष आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते कप घेण्यास नकार दिल्यानंतर मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन दुबईच्या हॉटेलमध्ये घेऊन गेले होते. अद्याप भारताला आशिया कप देण्यात आला नाहीये. त्यावरून बीसीसीआयनं नक्की यांना ई-मेल पाठवून पाठून ट्रॉफी देण्यास सांगतिलं आहे. (BCCI Warning ICC Action If Asia Cup Trophy Not Handed to India )

विजेत्या संघाला ट्रॉफी लवकरात लवकर सोपवावी, असा आदेश देणारा ई-मेल बीसीसीआयनं एसीसी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांना पाठवलाय. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी इंडिया टुडे सोबत बोलताना याबाबत माहिती दिली आहे. आम्ही एसीसीला पत्र लिहिलंय आणि ट्रॉफी विजेत्या संघाला दिली जावी, असे सांगितलंय.

आम्ही त्यांच्या उत्तराची वाट पाहतोय. जर प्रतिसाद आला नाही किंवा नकारात्मक उत्तर आले तर आयसीसीला पत्र लिहिणार असल्याचं देवजीत सैकिया म्हणाले आहेत. मोहसीन नक्वी ट्रॉफी देण्यास तयार झाले नाहीत तर बीसीसीआय कठोर कारवाई करणार. जर ट्रॉफी भारताला मिळाली नाही तर बीसीसीआय आयसीसीला पत्र लिहिणार आहे.

टीम इंडियानं आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानला 5 विकेटनं पराभूत केले होते. त्यावेळी भारतीय खेळाडूंनी मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार नसल्याचं सांगितलं होतं. भारतानं एमिरेटस क्रिकेट बोर्डाच्या उपाध्यक्षांनी ट्रॉफी द्यावी, अशी मागणी केली होती.

मोहसीन नक्वी यांनी भारताची ही अट मान्य केली नाही. मॅच जिंकल्यानंतर भारतीय खेळाडू जवळपास एक तास मैदानावर वाट पाहत राहिले पण तिढा सुटला नाही. मोहसीन नक्वी आशिया कपची ट्रॉफी घेऊन निघून गेले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तुम्हाला तात्या विंचू येऊन चावेल'; मोदीभक्त महेश कोठारेंना राऊतांचा टोला

किती गोंडस ती! रणवीर-दीपिका पादुकोणने पहिल्यांदा दाखवला मुलगी दुआचा चेहरा

Shocking : सुतळी बॉम्ब फोडताना घात झाला, एका चुकीमुळे तरुणाचा जीव गेला, ऐन दिवाळीत कुटुंबीयांच्या डोळ्यात पाणी

Raigad Politics: रायगडमधील राजकारणात मोठी उलथापालथ; राष्ट्रवादीचा नेता फुटला;भरत गोगावलेंनी खेळला मोठा डाव

दिवाळीत बोनसऐवजी दिली सोनपापडी; कामगार भडकले, कंपनीच्या गेटवरच डबे फेकले, Video Viral

SCROLL FOR NEXT