
महिला विश्वचषक २०२५ चा २० वा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात झाला. हा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात इंग्लंडच्या महिला संघाने यजमान भारताचा ४ धावांनी पराभव केला. भारतानेही उत्कृष्ट फलंदाजी केली, परंतु चार धावांमुळे सामना गमावावा लागला.
होळकर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, इंग्लंडकडून हीदर नाईटच्या शानदार शतकामुळे संघाला मोठी धावसंख्या गाठता आली. दरम्यान २८९ धावांचे आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. टीम इंडियाने फक्त ४२ धावांत दोन विकेट गमावल्या. तर स्मृती मानधना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यात एक शानदार भागीदारी झाली. या दोन्ही खेळाडूंनी तिसऱ्या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारी केली. हरमनप्रीत कौरने ७० चेंडूत ७० धावा केल्या. स्मृती मानधनाने ९४ चेंडूत ८८ धावा केल्या, ज्यात आठ चौकारांचा समावेश होता.
त्यानंतर दीप्ती शर्माने ५० धावांचे योगदान दिले. परंतु शेवटच्या षटकांमध्ये डाव गडगडला. शेवटी टीम इंडियाला ५० षटकांत ६ गडी गमावत फक्त २८४ धावाच करता आल्या. यासह, भारताला स्पर्धेत तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हीदर नाईटच्या शतकाच्या जोरावर ८ गडी गमावून २८८ धावा केल्या. टॅमी ब्यूमोंट आणि एमी जोन्स यांनी इंग्लंडला चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली. यटॅमी ब्यूमोंटने २२ आणि एमी जोन्सने ५६ धावा केल्या. तर हीदर नाईटने शानदार शतक झळकावले. तिने ९१ चेंडूत १०९ धावांची खेळी केली. यात १५ चौकार आणि एक षटकार होता. कर्णधार नॅट सायव्हर ब्रंटने ३८ धावांचे योगदान दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.